ETV Bharat / state

महिला दिन विशेष - अमिता दगडे पाटील यांचा शासकीय सेवेतील 21 वर्षांचा थक्क करणारा प्रवास - Pandharpur Latest News

अमिता दगडे पाटील या गेल्या 21 वर्षांपासून प्रशासकीय सेवेत काम करत आहेत, त्यांनी आतापर्यंत मंगळवेढा, कराड, वाई, सातारा, पाचगणी अशा विविध ठिकाणी काम केले आहे. सध्या त्या बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान त्यांनी केलेल्या विकासात्मक कामातून त्यांची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

अमिता दगडे पाटील
अमिता दगडे पाटील
author img

By

Published : Mar 8, 2021, 3:36 AM IST

Updated : Mar 8, 2021, 5:37 AM IST

पंढरपूर - तसा माझा जन्म सधन कुटुंबात झाला. बाबा बँकेत कामाला त्यामुळे घरामध्ये एक शैक्षणिक वातावरण. मी चार बहिणीमध्ये सर्वात मोठी. आई आणि बाबांनी पहिल्यापासूनच विचार स्वातंत्र्याला महत्त्व दिले. त्यांच्या प्रेरणेतूनच मला स्वतःचे व्यक्तिमत्व जाण्याची संधी मिळाली. त्याचाच फायदा प्रशासनामध्ये काम करताना मोठ्या प्रमाणावर झाला. नव्वदच्या दशकामध्ये प्रशासकीय सेवांमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्याही कमी होती. त्याच वेळी एमपीएससीचा अभ्यास करून प्रशासकीय सेवेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. अशा शद्बात ग्रामीण भागातून आलेल्या आणि स्वतःच्या जिद्दीवर प्रशासकीय अधिकारी बनलेल्या बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी आपला जीवन प्रवास उलगडला आहे.

अमिता दगडे पाटील यांचा शासकीय सेवेतील 21 वर्षांचा थक्क करणारा प्रवास

एकवीस वर्षांचा प्रेरणादायी प्रशासकीय प्रवास

सोलापूर तसेच सांगलीच्या ग्रामीण भागातून आलेल्या अमिता दगडे पाटील यांनी प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना ग्रामीण भागातील अनेक महिलांना फक्त आधारच दिला नाही, तर अधिकारही मिळवून दिला आहे. कुटुंबातील सदस्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच शिक्षणातही पाठिंबा दिला. त्यातूनच त्यांच्या विचाराला एक दिशा मिळाली. 1996 -97 च्या स्पर्धा परीक्षेमध्ये यामुळे त्यांना सहज यश मिळवणे शक्य झाले. त्यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात मंत्रालयाच्या कक्षापासून झाली. त्यानंतर त्यांना सोलापूर जिल्ह्यातील सतत दुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या मंगळवेढा नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2003 साली अमिता दगडे पाटील मंगळवेढ्यात रुजू झाल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी मंगळवेढा शहरातील पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा करून, पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला. त्यांच्या रुपाने मंगळवेढ्याला सक्षम अशी महिला अधिकारी मिळाली. त्यानंतर त्यांनी हातकलंगले, वाई, सातारा, पाचगणी या ठिकाणी आपल्या कामाच्या माध्यमातून विकासमुखी अधिकारी म्हणून छाप पाडली. सध्या त्यांनी नियुक्ती बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत काम करण्याची संधी

कराड नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी म्हणून अमिता दगडे पाटील यांनी 2010 ते 2013 या कालावधीत काम केले. मात्र त्या ठिकाणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत काम करत असताना कराड सारख्या शहराला विकासाच्या नव्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. कराडमध्ये विविध उपक्रम राबवले या उपक्रमाच्या माध्यमातून शहराचा विकास केला.

स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत उल्लेखनीय कामगिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील एक प्रकल्प म्हणजे स्मार्ट सिटी आहे. देशातील पहिल्या 100 स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर शहराचा समावेश झाला. त्यावेळी अमिता दगडे पाटील या सोलापूर महापालिकेच्या उपायुक्त होत्या. त्याचवेळी त्यांची नियुक्ती स्मार्ट सिटी योजनेतंर्गत होणाऱ्या प्रकल्पावर करण्यात आली. त्यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत आखणी करण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांचे उत्तम नियोजन केल्याने त्यांचा गैरव करण्यात आला.

महिलांसाठी फॅमिली फर्स्ट

प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना अमिता दगडे पाटील यांनी प्रशासकीय कामांबरोबर कुटुंबाचीही उत्तम अशी सांगड घातली आहे. प्रशासकीय सेवेमध्ये असताना कुटुंबातील सदस्यांना वेळ देता येत नाही, मात्र कुटुंब ही आपली जबाबदारी असल्याची जाणीव त्यांना आहे. त्यासाठी त्यांनी नवीन तंत्राचा अवलंब करतात मुख्य अधिकारी म्हणून काम करत असताना दिवसभर धावपळीचे काम असते. मात्र तरीही त्या नियमितपणे मुलांची संवाद साधतात. यामुळे अमिता दगडे पाटील ह्या एक उत्तम गृहिणी देखील आहेत.

आजची नारी अबला नाही तर सबला आहे

आजच्या पिढीतील सर्व महिला ह्या सक्षमीकरणाकडे यशस्वी झेप घेतांना दिसत आहेत. आजच्या घडीला पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे स्थान आहे. प्रत्येक क्षेत्रात आज महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. आजची महिला ही कार्य कर्तव्याला चालना देणारी व मनाला उभारी देणारी महिला आहे. 8 मार्च म्हणजे महिला दिनानिमित्ताने मी महिलांना एवढा संदेश देऊ इच्छिते की आजची नारी अबला नाही तर सबला असल्याचे अमिता दगडे पाटील यांनी म्हटले आहे.

Last Updated : Mar 8, 2021, 5:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.