ETV Bharat / state

'विधानसभेचं विद्यापीठ' : जाणून घ्या, गणपतराव देशमुखांबद्दल... - गणपतराव देशमुख यांचे निधन

55 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजवणारे, अभ्यासू असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले.

Former MLA ganapatrao deshmukh
गणपतराव देशमुख
author img

By

Published : Jul 31, 2021, 12:23 AM IST

Updated : Jul 31, 2021, 4:07 AM IST

सोलापूर - तब्बल 55 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकिर्द गाजवणारे, अभ्यासू नेते, राजकारणातील अजातशत्रू, अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी दीर्घ आजाराने निधन झाले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रदीर्घकाळ विधानसभेत काम करण्याचा गणपतराव देशमुख यांना अनुभव होता.

राज्यातील शेतकरी व कामगार चळवळीमध्ये आबा नावाने राज्यामध्ये गणपतराव देशमुख यांची ओळख तयार झाली. सांगोला मतदारसंघाच्या माध्यमातून डाव्या चळवळीतील एकहाती किल्ला तब्बल 55 वर्षे त्यांनी लढवला.

  • गणपतराव देशमुख 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले -

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विजय मिळवले.

महाराष्ट्र विधानसभेत 1962 पासून ते 2014 पर्यंत प्रदीर्घ काळ आमदारकी भूषवणारे एकमेव आमदार म्हणून गणपतराव यांची ओळख आहे. दरम्यान, 1972 ते 1995 साली त्यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर 1972 आणि 1995 या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने त्यांच्यावर निस्सीम प्रेम केले.

1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले, त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यानंतर 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या ऐवजी त्यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी शेकापच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यात अनिकेत देशमुख यांचा निसटता पराभव झाला होता.

  • शांत, संयमी व अभ्यासू नेतृत्व -

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख हे स्वभावाने अत्यंत शांत होते. भेटायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आदराने त्यांची विचारपूस करायचे. त्यांच्याजवळ समस्या घेऊन कोणीही आले तर ते प्रथम समस्या जाणून घेत व नंतर ती सोडवण्यासाठी प्रयत्न करत. समस्या सोडवल्यानंतर ते आवर्जून गावाची परिस्थिती काय आहे? गावात काय अडचणी आहेत? याबाबत ते आपुलकीने विचारत. प्रत्येक क्षेत्रातील त्यांचा गाढा अभ्यास होता. स्वच्छ प्रतिमा, साधी राहणी असल्याने प्रत्येकाला ते आपलेसे वाटत होते.

  • दोनवेळा झाला होता पराभव -

गणपतराव देशमुखे हे सांगोला मतदारसंघातून तब्बल 11 वेळा निवडून आले. 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या देशमुखांना केवळ 1972 आणि 1995 मध्ये त्यांचा पराभव झाला. 1972 मध्ये काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी त्यांचा पराभव केला. तर 1995मध्ये काँग्रेसचे शहाजीबापू पाटील यांनी त्यांना पराभूत केले. हे दोन पराभव वगळता देशमुख यांनी सातत्याने विजय मिळवला आहे.

हेही वाचा - शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

Last Updated : Jul 31, 2021, 4:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.