सोलापूर : सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी मागत असल्याने काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. काँग्रेसच्या शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी तर थेट बारामती लोकसभा मतदार संघ काँग्रेससाठी सोडा अशी मागणी केली होती. काँग्रेसच्या तीन वेळा काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची या प्रकरणात प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. उत्तर देताना थेट कोण रोहित पवार? असा उलटप्रश्न माध्यमांना केला. रोहित पवार यांची आमदारकीची पहिली टर्म आहे, त्यामुळे त्यांच्यातील पोरकटपणा गेलेला नाही.असे उत्तर देत प्रणिती शिंदेनी रोहित पवारांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
महिला आमदारांवर हल्ला : आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. महिला आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आमदार प्राणिती शिंदे यांनी निषेध केला. महिला आमदारच असुरक्षित असतील तर, सर्वसामान्य महिलांची सुरक्षा कशी होणार? असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यातील नेत्यांवर हल्ले होत असल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे,असे चित्र राज्यात निर्माण झाले आहे, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
अदानींची चौकशी गरजेची : देशाचे बडे उद्योगपती गौतम अदानींलरून भाजपवर सर्वच स्तरातून निशाणा साधला जात आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गौतम अदानींवर काही बोलत नाही. या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले की, अदानी यांची चौकशी व्हावी. लोकसभेत मोदी कधी चिडले नव्हते, पण राहुल गांधीनी गौतम अदानींवर केलेल्या भाषणावर पंतप्रधान मोदी चिडल्यासारखे दिसत होते, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.
सोलापुरात खासदार कुणाचा? : सोलापुरात खासदार कुणाचा,राष्ट्रवादीचा का काँग्रेसचा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सोलापूर शहरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सोलापूरचा खासदार राष्ट्रवादीचा व्हावा अशी मागणी, यापूर्वी राष्ट्रवादीमधील नेत्यांनी केली होती. काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी संताप व्यक्त करत,थेट बारामती लोकसभा मतदार संघ काँग्रेससाठी मागितला होता. सोलापूर शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते एकमेकांविरोधात तिखट प्रतिक्रिया देत आहेत.
हेही वाचा : Nana Patole on dispute with Balasaheb Thorat : काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू-नाना पटोले