ETV Bharat / state

आषाढी एकादशी : विठ्ठलाचे मंदिर 24 तास खुले राहणार; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय

author img

By

Published : Jul 12, 2021, 10:39 PM IST

आज श्री विठ्ठलाचा परंपरेनुसार पलंग काढण्यात आला, त्या ऐवजी विठ्ठलाला लोड देण्यात आला आहे. तर रुक्मिणी मातेला तक्क्या देण्यात आला. दरम्यान, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आषाढी परंपरेनुसार 24 तास खुले राहणार आहे.

विठ्ठलाचे मंदिर 24 तास खुले राहणार
विठ्ठलाचे मंदिर 24 तास खुले राहणार

पंढरपूर - कोरोनासंसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारकडून पांडुरंगाचा आषाढी यात्रा सोहळा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे आज श्री विठ्ठलाचा परंपरेनुसार पलंग काढण्यात आला, त्या ऐवजी विठ्ठलाला लोड देण्यात आला आहे. तर रुक्मिणी मातेला तक्क्या देण्यात आला. दरम्यान, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आषाढी परंपरेनुसार 24 तास खुले राहणार आहे. मात्र, कोणत्याही भाविकाला प्रवेश आत प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहाअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

व्हिडीओ

आषाढीनिमित्त विठ्ठल मंदिर 24 तास खुले राहणार -

गेल्या दोन वर्षापासून आषाढी यात्रा सोहळा हा कोरोनामुळे प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्यात येत आहे. आषाढी यात्रा दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी भरत असते. त्यानुसार 20 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. 11 ते 24 जुलैपर्यंत आषाढ महिना पाळला जातो. त्यानुसार श्रीविठ्ठलाचा पलंग काढून त्याऐवजी लोड देण्यात येतो, तर रुक्मिणी मातेला तक्क्या देण्यात येत असतो. आषाढी कालावधीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन सर्वसामान्य भाविकांना खुले असते. मात्र, यंदा कोरोनामुळे विठ्ठल मंदिर बंद भाविकांसाठी बंद असले, तरीही विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन भाविकांना ऑनलाईन घेता येणार आहे.

आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाची राजोपचार पूजा बंद -

आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन भाविकांसाठी 24 तास खुले असते. त्यानुसारच श्रीविठ्ठलाच्या राजोपचार पूजा ही बंद करण्यात येत असतात. यामध्ये काकडा, आरती, पोशाख, धूपारती शेजारती इत्यादी राजोपचार बंद होऊन त्याऐवजी नित्य पूजा, महानैवेद्य व गंधाक्षरा हे राजोपचार प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी ऑनलाईन सुरू राहणार आहे.

हेही वाचा - अनिल देशमुखांच्या याचिकेसंदर्भतील निकाल राखीव; तर सीबीआयला अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.