ETV Bharat / state

Ashadhi Wari 2023 : मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे चांगलेच, सोबत विठ्ठलाची पूजा करणाऱ्या वारकऱ्यांची भावना - Uddhav Thackeray

यंदा आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा सूरू असतानाही वारकऱ्यांना विठ्ठलाचे मुखदर्शन सुरूच असणार आहे. त्यातच याआधी उद्धव ठाकरेंसोबत मानाची पूजा करण्याचा मान मिळालेले विठ्ठल बडे महाराज म्हणाले की, उद्धव ठाकरे हे चांगलेच मुख्यमंत्री आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

Ashadhi Wari 2023
विठ्ठलाची पूजा
author img

By

Published : Jun 27, 2023, 4:21 PM IST

सोलापूर ( पंढरपूर ) : पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील मोठा उत्सव आहे. या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा होणार आहे. परंतु राज्यातील सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यानंतर सर्वसामान्य लोकांमध्ये मात्र संतप्त प्रतिक्रिया असून उद्धव ठाकरेंना धोका दिल्याच्या भावना आहे. खरंतर कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी महापूजा केली होती. त्यांच्यासोबत पूजेचा मान मिळालेले वारकरी म्हणजे विठ्ठल बडे महाराज यांनी मात्र उद्धव ठाकरे हे चांगलेच मुख्यमंत्री आहेत. अशा भावना व्यक्त केल्या आहेत. राजकारण तर मोठे होत राहील. परंतु माणूस म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा जर ते काम करत राहिले तर मुख्यमंत्री सुद्धा होतील. अशा भावना महाराजांनी व्यक्त केले आहे.

उद्धव ठाकरेंसोबत पूजा करण्याचा मान : विठ्ठल महाराज बडे हे गहीनाथ गडावरुन येणाऱ्या वामनभाऊंच्या दिंडीमध्ये सहभागी असतात. गेल्या सात वर्षापासून त्यांच्या ही परंपरा चालू आहे. ते स्वतः पायी वारी करतात. ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस उद्धव ठाकरेंसोबत मानाची पूजा करण्याचा मान विठ्ठल बडे यांना मिळाला होता. गेल्या दहा ते अकरा वर्षांपासून विठ्ठलाच्या मुख्य विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात विनाची सेवा करतात. पूर्ण वेळ विणेकरी म्हणून ते या ठिकाणी काम करत आहेत. त्या मानाच्या पाच विनेकरांना विठ्ठलाचा नैवेद्य जेवण म्हणून दिले जाते. त्यामध्ये सुद्धा विठ्ठल महाराज बडे यांचा सहभाग होता. त्यांचे रोजचे जेवण म्हणजे विठ्ठलाचा दिलेला प्रसाद असतो.

वारकऱ्यांची सेवा करावी : 87 वर्षे झाले आजही पांडुरंग जोपर्यंत सेवा करून घेईल तोपर्यंत सेवा करण्याचा मानस त्याने बोलून दाखवला. सरकारने चंद्रभागा नदी स्वच्छ करावी, अशी भावना त्याने व्यक्त केली. वारकऱ्यांना तुम्ही सुविधा देऊ शकत नाही. कारण मोठे रस्ते नाहीत, राहण्याच्या अडचणी आहेत. खाण्यापिण्याच्या अडचणी आहेत. सरकार या ठिकाणी का सोय करत नाही हा प्रश्न आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा वारकऱ्यांची सेवा करावी, नदी स्वच्छ करावी, नदीमध्ये प्रदूषण होऊ नये याची दक्षता घ्यावी. येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना त्यांच्या विठ्ठलाला भेटल्याचे समाधान मिळावे इतके तरी त्यांना सुख सुविधा सरकारने दिले पाहिजे. जेवढ्या पाहिजे तेवढ्या सुख सुविधा पंढरपुरामध्ये नसल्याचे विठ्ठल महाराज बडे यांनी सांगितले. देवाने काही देण्यापेक्षा किंवा आपण काही मागण्यापेक्षा त्याची सेवा करण्यातच धन्यता मानली पाहिजे. अशी भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -

  1. KCR Pandharpur Visit: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव देशाचे नेतृत्व करू शकतात- केसीआर नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया
  2. KCR Maharashtra Visit: बीआरएस ही कुणाची बी टीम नसून शेतकऱ्यांची टीम -केसीआर
  3. Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशी, विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरीची वारी; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.