ETV Bharat / state

पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन; आयोजकांवर गुन्हा दाखल - ajit pawar pandharpur news

पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ajit pawar
अजित पवारा
author img

By

Published : Apr 9, 2021, 12:59 PM IST

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तसेच, भाजप नेते कल्याणराव काळे यांच्या प्रवेश समारंभाचा कार्यक्रम पंढरपूर येथे झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री दत्ता भरणे हे उपस्थितीत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयोजक श्रीकांत शिंदेंवर गुन्हा दाखल

भाजप नेते व चंद्रभागा साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सभेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नव्हते. सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे असतानाही कोणत्या प्रकारच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. यामुळे आयोजक श्रीकांत शिंदे यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 188 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

अजित पवार यांच्या सभेतील आयोजकावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पंढरपूर मधील श्रेयस पॅलेस येथे घेण्यात आला होता. त्यावेळेसही कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते. त्यामुळे तेव्हाही पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष संदीप मांडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - गोंदिया : नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगलात आग, 3 ठार

हेही वाचा - धक्कादायक! मुस्लिम महिलेचा मृतदेह दिला हिंदु कुटुंबाला; अंत्यसंस्कार होऊन गेल्यावर सत्य समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.