सोलापूर - करमाळा तालुक्यातील साडे गावातील गटारे तुंबल्यामुळे गावात रोगराई पसरली आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांनी तक्रार करून देखील गटारांची सफाई न केल्याने ग्रामस्थांनी संतप्त होऊन ग्रामपंचायतीमध्ये गटारातील घाण टाकून आंदोलन केले आहे.
हेही वाचा - मी राष्ट्रवादीत होतो आणि राष्ट्रवादीतच राहणार; अजित पवारांनी ठणकावून सांगितले
करमाळा तालुक्यात अनेक भागात डेंग्यूसदृश्य रुग्ण आढल्याने पंचायत समितीद्वारे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना स्वच्छतेबाबत सूचना केलेली असताना देखील साडे ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे. गावातील गटारी तुंबल्या असून गावात अनेक ठिकाणी मृतावस्थेत जनावरे आढळली असून ठिकठिकाणी चेंबर तुंबल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. अनेकांच्या दारात हे दूषित पाणी साचल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हेही वाचा - उद्धव ठाकरे २८ नोव्हेंबरला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, ३ डिसेंबरला सिद्ध कराव लागणार बहुमत
आरोग्य विभागाने देखील ग्रामपंचायतीला स्वच्छतेसंदर्भात पत्र देऊन सुद्धा स्वच्छता केली नाही. ग्रामस्थांनी देखील ग्रामपंचायतीकडे वारंवार गटारी साफ करा म्हणून तक्रारी केल्या आहेत, तरी देखील ग्रामपंचायतीने याकडे कानाडोळा करून ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत असल्याच्या व्यथा ग्रामस्थांनी मांडल्या आहेत. या बाबत गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांना विचारले असता, त्यांनी संबंधित गावामध्ये तत्काळ पाहणी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.