ETV Bharat / state

सोलापूर : केममध्ये उत्तरेश्वर महाराज यात्रा उत्सहात संपन्न

उत्तरेश्वर महाराज मंदिराला यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेमध्ये खेळणी विक्री करणाऱ्या विविध स्टॉल धारकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रेमध्ये पुणे, मुंबई, सोलापूर या ठिकाणाहून शेकडो भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शवली होती.

उत्तरेश्वर महाराज मंदिराचे प्रवेशद्वार
उत्तरेश्वर महाराज मंदिराचे प्रवेशद्वार
author img

By

Published : Mar 1, 2020, 1:24 PM IST

सोलापूर - करमाळा तालुक्यातील केम गावामधील देवस्थान उत्तरेश्वर महाराज हे प्राचीन मंदिर असून उत्तरेश्वर महाराज यांची यात्रा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात पार पडली.

यावेळी उत्तरेश्वर महाराज मंदिराला यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेमध्ये खेळणीच्या विविध स्टॉल धारकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रेमध्ये पुणे, मुंबई, सोलापूर या ठिकाणाहून शेकडो भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शवली होती.

उत्तरेश्वर महाराजांचा छबिन्याची रात्री बारा वाजता वाजत गाजत केम गावातून मिरवणूक काढण्यात आली. सकाळी नऊ वाजता मंदिरात छबिना परत आला. छबिन्याच्या वेळी शोभेची दारू उडविण्यात आली. यावेळी यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेसाठी पोलीस प्रशासन, महसूल विभाग व यात्रा समिती व ग्रामस्थांच्या वतीने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व सुविधेंचा बंदोबस्त करण्यात आला होता.

हेही वाचा - सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात बार्शीत मांतग समाजाचे बेमुदत उपोषण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.