ETV Bharat / state

Shinde Group : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून शिवसेने मार्फत जनतेची सेवा करणारे निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर ( Retired Police Officer Bhausaheb Andhalkar ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना भेटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Shinde group
Shinde group
author img

By

Published : Oct 28, 2022, 9:31 AM IST

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला ( Big blow to Uddhav Thackerays Shiv Sena ) आहे. अनेक वर्षांपासून शिवसेने मार्फत जनतेची सेवा करणारे निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर ( Retired Police Officer Bhausaheb Andhalkar ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना भेटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांना किंवा कार्यकर्त्यांना आता मान सन्मान राहिला नाही. बार्शी तालुक्यात शिवसैनिकांना साधी इन्ट्री देखील नव्हती. त्यावेळी शिवसेना वाढविण्यात मोठा प्रयत्न केला. तरीही पक्षातील पक्षश्रेष्ठी हे पक्ष प्रमुखांशी भेटू देखील देत नाहीत. सद्यस्थितीत शिवसेनेत फक्त करा कष्ट अन् खावा उष्ट अशी परिस्थिती झाली आहे. असा गंभीर आरोप करत भाऊसाहेब आंधळकर यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे.

Shinde group

पंधरा लाख लोकांना शिवसेनेमार्फत जेवण खाऊ घातला मात्र साधं नाव देखील घेतलं नाही : बार्शी तालुक्यात विरोधकांची जबरदस्त दहशत होती. शिवसेने साठी साधं भगवा धागा बांधणे देखील भीतीदायक वातावरण होते. त्यावेळी शिवसैनिक म्हणून बार्शी मध्ये शिवसेना वाढवली. कोरोना काळात दहा ते पंधरा लाख लोकांना शिवसेनेमार्फत जेवण खाऊ घातलं तरीही पक्ष प्रमुख दखल घेत नाहीत. साधं नाव घेऊन कौतुक देखील करत नाहीत म्हणून उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे च्या बाळासाहेबांची शिवसेना यामध्ये प्रवेश करत असल्याचे आंधळकर यांनी जाहीर केले आहे.

आमदारकीची तिकीट देखील दिलं नाही : बार्शी तालुक्यात तीन वेळा विधानसभा निवडणुका झाल्या. 2011 पासून बार्शी तालुक्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी कार्य केले. आजतागायत आमदारकीचं तिकीट देताना तीन वेळा जाणूनबुजून डावलण्यात आले.उलट मुंबई वरून पक्ष निरीक्षक म्हणून आलेले स्वतःचे खिशे भरून गेले असे गंभीर आरोप भाऊसाहेब आंधळकर यांनी केले आहे.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पक्षश्रेष्ठी आमची दखल घेत नाहीत असे सांगत आंधळकर यांनी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ढाल तलवार हाती घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.