सोलापूर - प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील कामासाठी वापरलेला कच्चा माल तपासणी करून देण्यासाठी फी सोबत अधिक रकमेची मागणी करणाऱ्या दोन अभियंत्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 3 नोव्हेंबर) दुपारी कारवाई केली आहे. विषेश म्हणजे या दोघा संशयित लाचखोरांनी लाच ऑनलाइनरित्या एका खासगी व्यक्तीच्या बँक खात्यावर व स्वतःच्या बँक खात्यावर देखील लाच स्वीकारत होते.
सुवर्णा शिवाजी सगर (वय 32 वर्षे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कनिष्ठ अभियंता) आणि शिवराम जनार्दन केत (वय 49 वर्षे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण विकास रस्ते), अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
कनिष्ठ अभियंता सुवर्णा सगर यांनी तक्रारदारास बांधकाम माल तपासून देण्यासाठी ऑनलाइन साडे सहा हजार भरण्यास सांगितले होते. तडजोडी अंती उपअभियंता शिवराम केत यांनी 5 हजार रुपये भरण्यासाठी सांगितले होते. पण, बांधकामाचे साहित्य तपासण्यासाठी खरी फी ही 4 हजार 7 रुपये आहे. ग्राम सडक योजनेतील दोन्ही अभियंत्यांनी 993 रुपये अधिकची लाच ऑनलाइन रित्या स्वीकारले आहे. याबाबत ऑनलाइन लाच घेणाऱ्या दोघा अभियंत्यांविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपधीक्षक संजीव पाटील, जगदिश भोपळे व त्यांच्या पथकाने केली आहे.
ऑनलाइन पद्धतीने मांडला होता भ्रष्टाचाराचा खेळ
सुवर्णा शिवाजी सगर आणि शिवराम जनार्दन केत हे शासकीय फीपेक्षा अधिक रक्कम एका खासगी व्यक्तीच्या बँक खात्यावर ऑनलाइन रकमा जमा करून घेत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ज्यावेळी ही तक्रार आली त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, शासकीय फी कमी किंवा जास्त आकारता येत नाही. त्यावेळी त्यांनी सापळा लावून संशयित आरोपी अभियंत्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर ऑनलाइन रक्कम जमा करून त्यांना अटक केले आहे.
हेही वाचा - चार महिन्यापासून घंटा गाडीचे 'कोरोना वॉरियर्स' वेतनापासून वंचित