ETV Bharat / state

वडवळजवळ डांबर वाहतूक करणारा ट्रक रेल्वे ट्रकवर पडला, मध्य रेल्वेच्या गाड्यांना अडथळा

मुंबईहून डांबराचे पिंप घेऊन ओरीसाकडे निघालेला ट्रक वडवळनजिक आला असता, ड्रायव्हरचा तोल गेल्याने तो ट्रक पुलानजिकच्या साईट पट्टीवरुन वीस फुट खाली कोसळला. तो ट्रक रेल्वेच्या मुख्य लाईनवर जावून पडला.

डांबर वाहतूक करणारा ट्रक रेल्वे ट्रकवर पडला
author img

By

Published : Aug 29, 2019, 7:08 PM IST

सोलापूर- मुंबईहून ओरीसा येथे डांबराचे पिंप घेऊन निघालेला ट्रक वडवळ रेल्वेपूलानजिक असलेली साईडपट्टी तोडून खालच्या रेल्वे लाईनवर कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात रेल्वेरुळासह गाडीचे सुमारे १७ लाखांचे नुकसान झाले. या घटनेची अगोदरच रेल्वे प्रशाशनाला माहिती मिळाल्याने सर्व गाड्या थांबविण्यात आल्या, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

डांबर वाहतूक करणारा ट्रक रेल्वे ट्रकवर पडला

मुंबईहून डांबराचे पिंप घेऊन ओरीसाकडे निघालेला ट्रक (के .ए .५६ / ३६४९) हा वडवळजवळ आला असता, ड्रायव्हरचा तोल गेल्याने तो ट्रक पुलानजिकच्या साईट पट्टीवरुन वीस फुट खाली कोसळला. ट्रक रेल्वेच्या मुख्य लाईनवर जावून पडला. या ट्रकमध्ये रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे डांबराचे ड्रम होते. यात हायवेचे ९० हजार, रेल्वेचे १ लाख तर डांबर आणि ट्रक, असे एकून १७ लाखांचे नुकसान झाले.

घटना घडताच रेल्वे रुळावर काम करणारे कामगार पटूशा वगरे आणि विपूल सलगर यांनी तातडीने मोहोळच्या रेल्वे प्रशासनास सुचना दिल्या. त्यामुळे या मार्गावरील सर्व गाड्या थांबविण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर झाले. दरम्यान, रेल्वे प्रशासनाची आपातकालीन रेल्वे व्हॅन घटनास्थळी हजर होती. ८.४५ ते १२.२० अशा अडीच तासात रुळ पुर्ववत करण्यात आला. या बाबत मोहोळ पोलीस ठाण्यात ट्रक चालक नवनाथ मारुती पूरी यांच्यावर रेल्वे प्रशासनाच्या गाड्या येण्या-जाण्यास अडथळा केला म्हणून रेल्वे अधिनियम १७४ नुसार व भादवी २७९ , ४२७ नुसार पोलीस प्रशाशनाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार नागराज निंबाळे करत आहेत.

Intro:सोलापूर : मुंबईहुन ओरीसा येथे डांबराचे पिंप घेऊन निघालेला ट्रक वडवळ रेल्वेपुलानजिक असलेली साईडपट्टी तोडुन खालच्या रेल्वे लाईनवर कोसळल्याने अपघात झालाय. या अपघातात रेल्वेरुळासह गाडीचे सुमारे १७ लाखाचे नुकसान झाले. रेल्वे रुळावर येनाऱ्या गाडीअगोदरच रेल्वे प्रशाशनाला खबर मिळाल्याने सर्व गाडया थांबविण्यात आल्या,अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. Body:मुंबईहुन डांबराचे पिंप घेऊन ओरीसा कडे निघालेला ट्रक नं के .ए .५६ / ३६४९ हा ट्रक वडवळनाजिक आला आसता ड्रायव्हरचा तोल गेल्याने तो ट्रक पुलानजिकच्या साईट पट्टी वरुन वीस फुट खाली कोसळला.तो ट्रक रेल्वेच्या मेन अप लाईनवर जावुन पडला.या ट्रकमध्ये रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे डांबराचे ड्र्म होते . या मधे हायवेचे ९० हजार, रेल्वेचे १ लाख तर डांबर आणि ट्रक असे एकुन १७ लाखचे नुकसान झाले .
घटना घडताच रेल्वे रुळावर काम करनारे कामगार पटूशा वगरे व विपुल सलगर यांनी तातडीने मोहोळच्या रेल्वे प्रशासनास सुचना दिल्या. त्या मुळे या मार्गावरिल सर्व गाड्या थांबविन्यात आल्या.घटनेची माहीती मिळताच रेल्वे प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर होत. दरम्यान रेल्वे प्रशासनाची एमरजन्सी रेल्वे व्हॅन घटनास्थळी हजर होती ८ . ४५ ते १२ .२० आडीच तासात रुळ पुर्ववत करण्यात आला.Conclusion:या बाबत मोहोळ पोलीस ठाण्यात ट्रक चालक नवनाथ मारूती पूरी रा कौठा ता उमरगा याच्या वर रेल्वे प्रशासनाच्या गाडया येण्या जान्यास अडथळा केला म्हणूण रेल्वे अधिनियम १७४ नुसार व भादवी २७९ , ४२७ नुसार या बाबत पोलीस प्रशाशनाच्या वतीन गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सहाय्यक फौजदार नागराज निंबाळे करित आहेत .
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.