ETV Bharat / state

Ashadhi Wari 2023: संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन, रिंगण सोहळ्याने वारकरी सुखावला - Ashadhi wari 2023

श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत तुकाराम महाराज पालखीचे स्वागत केले. तसेच या रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

Tukaram Maharaj Palkhi sohala
संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूरात आगमन
author img

By

Published : Jun 24, 2023, 4:52 PM IST

सोलापूर : हरी नामाचा गजर करीत 'भक्ती रसात' चिंब न्हाऊन गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.

पालखीचे अकलूज येथे आगमन : हाती दिंड्या पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन, भक्तिमय वातावरणात ऊन वाऱ्याची तमा न बाळगता, आपल्या सावळ्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर चालत आहेत. नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.३० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला.

पालकमंत्र्यांनी केले सारथ्य : पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. यावेळी रथात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते भाविकांना ओआरएस पाकिटाचे वाटप करण्यात आले. गळ्यात वीणा घेऊन पालकमंत्री पालखी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी वारकरी भविकांसमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगरपरिषदेच्यावतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत केले.

नेत्रदीपक रिंगण सोहळा : जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणी धावणे भाविकांसाठी एक पर्वणीच ठरली. भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा 'याची देही याची डोळा 'अनुभवता आला. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला.

अमेरिकन राजदूताची उपस्थिती : सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी पालखी सोहळ्याचा सुखद अनुभव घेण्यासाठी, अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी हे आवर्जून उपस्थितीत होते.

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी : रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हे या रिंगण सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले. रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नाना पटोले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम सातपुते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी अधिकारी, वारकरी भाविक आणि अकलूज व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Ashadhi wari 2023 : तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत दाखल, अजित पवारांनी केले सारथ्य
  2. Sant Tukaram Maharaj Palkhi : जी२० परिषदेच्या परदेशी प्रतिनिधींनी घेतले पालखीचे दर्शन; याची देही याची डोळा अनुभवला पालखी सोहळा
  3. Palkhi Darshan In Pune: पालखी दर्शनासाठी पुणेकरांची मोठी गर्दी; 6 लाख भाविकांनी घेतले दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.