ETV Bharat / state

सोलापुरात 31 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, बाधितांचा आकडा तीनशे पार - सोलापूर बातमी

आज सोलापुरात 31 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ झाली असून 11 आणि 12 मे रोजी मृत्यू झालेल्या दोघांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 308 तर मृतांचा आकडा 21वर पोहोचला आहे.

file photo
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : May 13, 2020, 9:07 PM IST

सोलापूर - सोलापुरात कोरोनाबाधितांची बुधवारी (दि. 13 मे) 31 नव्या रुग्णांची वाढ झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंतचा बाधितांचा आकडा 308वर पोहोचला आहे तर मृतांंची आजपर्यंतची संख्या 21 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

आजपर्यंत 3 हजार 502 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी 3 हजार 360 अहवाल प्राप्त झाले. यात 3 हजार 52 निगेटिव्ह तर 308 पॉझिटिव्ह आहेत.

आज (दि. 13 मे) एका दिवसात 129 अहवाल प्राप्त झाले असून यात 98 निगेटिव्ह तर 31 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 15 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश आहे. सोमवारी (दि. 11मे) गुरुनानक नगर येथील 60 वर्षीय पुरुष व्यक्तीचा झाला होता. मंगळवारी (दि. 12 मे) इंदिरा वसाहत, भवानी पेठ येथील 72 वर्षीय एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. या दोघांचे कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत.

आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 308 मध्ये 173 पुरूष तर 135 महिलांचा समावेश आहे. तर मृत 21 पैकी 11 पुरुष व 10 महिलांचा समावेश आहे. रुग्णालयातून बरे होवून गेलेल्यांची संख्या 84 असून यात 55 पुरूष तर 29 महिलांचा समावेश आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये साईबाबा चौक परिसरात 2 पुरूष, 4 महिला, लष्कर सदर बझार परिसरात 1 पुरूष, 1 महिला, शास्त्री नगर परिसरात 2 पुरूष, 2 महिला, नवनाथ नगर परिसरात 1 महिला, भारतरत्न इंदिरानगर भागात 3 पुरूष, 4 महिला, रामलिंग नगर परिसरात 1 पुरूष, कुमारस्वामी नगर परिसरात 1महिला, बेगमपेठ परिसरात 1 पुरूष, केशव नगर परिसरात 1 पुरुष, गवळी वस्ती, जुना कुंभारी रोड भागात 1 पुरूष, जुळे सोलापूर परिसरात 1 पुरूष, एकता नगर परिसरात 1 पुरूष, भवानी पेठेतील इंदिरा वसाहतीत 1 पुरूष, पोलीस मुख्यालय परिसरात 1 महिला, रंगभवन परिसरात 1 महिला, रविवार पेठ परिसरातील एका महिलेचा समावेश आहे.

हेही वाचा - सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 152 पोलिसांना घरीच थांबण्याचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.