पंढरपूर (सोलापूर) - सांगोला तालुक्यातील सोनंद गावाजवळ ट्रक आणि बुलेट समोरासमोर धडक ( Accident in track and bike at sangola ) झाल्यामुळे बुलेट वरील तीन युवक जागीच ठार झाल्याची ( Accident In Solapur ) घटना घडली आहे. सोनंद इथून देव दर्शन करून परत येणाऱ्या अक्षय मलपे, शरद गजले आणि आदिनाथ मंडले (रा. खर्डी ता. पंढरपूर) असे मृत झालेल्या युवकाचे नाव ( Three youths died in accident solapur ) आहे. सणा दिवशी झालेल्या घटनेमुळे गावावर खर्डी गावावर शोककळा पसरली आहे.
ट्रक आणि बुलेटमध्ये भीषण अपघात -
सांगोला तालुक्यातील सोनंद गावाजवळ यल्लमा देवीच्या दर्शनासाठी अक्षय मलपे, शरद गजले आणि आदिनाथ मंडले हे बुलेट वरून तिघेजण गेले होते. मात्र सोनंद गावाजवळून बाहेर पडले असता. पंढरपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रक व खर्डी च्या दिशेने जाणाऱ्या बुलेटच समोरासमोर धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बुलेटचा चुरा झाला होता.
एकाच गावातील तिघांचा मृत्यू -
ट्रकने समोरून जोरात बुलेटला धडक दिली. बुलेट वरील एक जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघा जणांवर उपचारासाठी घेऊन जात असताना मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये एका गावातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे ट्रक चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - ट्रक पिकअप टेम्पोच्या भीषण अपघातात 3 ठार, तर एक जण गंभीर जखमी