सोलापूर- बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील शिराळे गावात एका फटका फॅक्टरीत रविवारी दुपारच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली ( Firecrackers Blast in Barshi taluka) आहे. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना झाला भीषण स्फोट ( Terrible explosion in hita factory in Barshi taluka ) झाला आहे. फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास 40 कर्मचारी काम करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
आग नियंत्रित- स्थानिक ग्रामस्थांनी, अग्निशमन दलाने आग नियंत्रित केली असून फॅक्टरीमधील सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. स्फोटा दरम्यान तीन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तिन्ही महिलांचे शव पांगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. एका रुग्णाची परिस्थिती अत्यंत नाजूक झाल्याने त्याला उपचारासाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कर्मचारी गंभीररित्या होरपळले - स्थानिकांच्या माहितीनुसार फटका फॅक्टरीत काम करणारे 6 ते 7 कर्मचारी जबरदस्त जखमी झाले आहे.अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहे.रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल असून मृतदेह जखमींचे शोध घेत असल्याची माहिती पांगरी येथील डॉक्टरांनी दिली.
तीन महिला ठार तर ,तीन महिला गंभीर - पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ वीरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयात तीन महिलांचे मृतदेह आहेत. त्यांची ओळख अद्याप पटली नाही. पोलीस प्रशासन त्याबाबत चौकशी करत आहेत. तर तीन महिला गंभीररित्या उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांवर उपचार सुरू आहे. आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाहीत. रुग्णवाहिका शिराळे गावात घटनास्थळी आहेत,आगीच्या फुफाट्यामधून,मृतदेह जखमींचा शोध सुरु आहे.