ETV Bharat / state

लोकसभा निवडणूक 2019 : माढातील ३ गावांचा मतदानावर बहिष्कार

गेल्या अनेक वर्षांपासून पाणी आणि रस्ता यासारख्या मूलभूत प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे. वर्षानूवर्षे निवेदन, अर्ज विनंत्या करून हे गावकरी वैतागले आहेत. मात्र, अजूनही त्यांचे मूलभूत प्रश्नी मार्गी लागलेले नाहीत. हे प्रश्न न सुटल्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय युवकांनी घेतला आहे.

सोलापूर
author img

By

Published : Mar 12, 2019, 4:47 PM IST

सोलापूर - गेल्या अनेक वर्षांपासून पाणी रस्ता यासारख्या मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या माढा तालुक्यातील ३ गावांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकला आहे. उजनी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आलेगाव खुर्द, रुई, गारअकोले या गावांचा यात समावेश आहे. या गावांतील नागरिकांनी आलेगाव येथे बैठक घेऊन मतदानावरील बहिष्काराचा निर्णय घेतला.

सोलापूर

गेल्या अनेक वर्षांपासून पाणी आणि रस्ता यासारख्या मूलभूत प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे. वर्षानूवर्षे निवेदन, अर्ज विनंत्या करून हे गावकरी वैतागले आहेत. मात्र, अजूनही त्यांचे मूलभूत प्रश्नी मार्गी लागलेले नाहीत. हे प्रश्न न सुटल्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय युवकांनी घेतला आहे.
ही गावे भीमा नदी लगत असूनही पाण्याअभावी पिके जळून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या भागाची मुख्य समस्या म्हणजे नदीपात्रात पाणी टिकून राहत नाही. सोलापूर जिल्ह्यातील रुई, आलेगाव खुर्द, गारअकोले तसेच पुणे जिल्ह्यातील भांडगाव बावडा गणेशवाडी या गावालगतच्या भीमा नदीचे प्रवाह पात्र अत्यंत उथळ स्वरूपाचे आहे. त्यामुळे या ठिकाणची नदीपात्रातील पाणी साठवणक्षमता शून्य आहे. त्यासाठी भीमा नदी वरती आलेगाव खुर्द येथे बंधारा किंवा भिंत बांधणे गरजेचे आहे, त्यामुळे या भागाचा कायमस्वरूपीचा प्रश्न सुटणार आहे. प्रशासन मात्र प्रत्येक वर्षी सक्तवसुली पद्धतीने पाणीपट्टी शेतकऱ्यांकडून घेत असते. प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने उपोषणे करूनही हा प्रश्न सुटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

आलेगाव खुर्द ते गारअकोले गणेशवाडी पूल या रस्त्यावरती स्वातंत्र्य काळापासून फक्त एकदा डांबरीकरण झाले होते. परंतु, सध्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. कोंढारपट्टा हे सोलापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे. या भागातील लोकांना अकलूज या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्यामुळे नियमित दळणवळणासाठी या रस्त्याचा उपयोग होतो तसेच अकलूज, सराटी, बावडा या ठिकाणी शिक्षणासाठी रांजणी-भिमानगर, आलेगाव बुद्रुक, रुई, आलेगाव खुर्द या गावातून सुमारे हजार ते दीड हजार विद्यार्थ्यांची रोज ये-जा होते. परंतु या रस्त्याची गेल्या ४० वर्षापासून डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम झाला आहे. मणक्याचे आजार, मणक्यात गॅप पडणे, सांध्यांचे आजार यांनी ग्रस्त आहेत. रस्त्याच्या या अवस्थेमुळे लोकांच्या जीवावर बेतत आहे.

पाणी आणि रस्ता यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाहीत. तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान न करण्याचा, कोणत्याही राजकीय प्रचार सभा या गावात होऊ न देण्याचा तसेच राजकीय उमेदवार, कोणत्याही पक्षाशी संबंधित व्यक्तींना या भागात फिरू दिले जाणार नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. वर्षानूवर्षे फक्त आश्वासनच दिली गेल्यामुळे आपले प्रश्न सोडविण्यासाठी कोणीच वाली राहिलेला नाही, अशी भावना या ३ गावातील लोकांची झाली आहे. त्यामुळेच लोकशाहीतील सर्वोच्च उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवरच त्यांना नाईलाजाने बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे.

Intro:R_MH_SOL_01_12_BYCOT_ON_LOKSABHA_POLL_S_PAWAR_VIS
माढा तालुक्यातील तीन गावांनी लोकसभा निवडणूकीतील मतदानावर बहिष्कार टाकला आहे. उजनी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या आलेगाव खुर्द, रुई, गारअकोले या गावामध्ये मागील अनेक वर्षापासून पाणी आणि रस्ता यासारख्या मुलभूत सुविधा देखील देण्यात आलेल्या नाहीत. मुलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे माढा तालूक्यातील या तीन गावांनी लोकसभा निवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. माढा तालूक्यातील या तीन गावांतील लोकांनी आलेगाव येथे बैठक घेऊन मतदानावरील बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.
Body:व्हीओ- उजनी धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द, रुई, गारअकोले या गावातील लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणी आणि रस्ता यासारख्या मूलभूत प्रश्नांसाठी झगडावे लागत आहे. वर्षानूवर्षे निवेदन , अर्ज विनंत्या करून हे गावकरी थकले आहेत. मात्र अजूनही त्यांचे मूलभूत प्रश्नी मार्गी लागलेले नाहीत. हे प्रश्न न सुटल्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यावर संपूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय युवकांनी घेतला आहे.
बाईट-

Vo - ही गावे भीमा नदी लगत असूनही पाण्याअभावी पिके जळून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात प्रत्येक वर्षी नुकसान होते. या भागाची मुख्य समस्या म्हणजे नदीपात्रात पाणी टिकून राहत नाही. सोलापूर जिल्ह्यातील रुई, आलेगाव खुर्द, गारअकोले तसेच पुणे जिल्ह्यातील भांडगाव बावडा गणेशवाडी या गावालगतच्या भीमा नदीचे प्रवाह पात्र अत्यंत उथळ स्वरूपाचे आहे. त्यामुळे या ठिकाणची नदीपात्रातील पाणी साठवणक्षमता शून्य आहे. त्यासाठी भीमा नदी वरती आलेगाव खुर्द येथे बंधारा किंवा भिंत बांधणे गरजेचे आहे त्यामुळे या भागाचा कायमस्वरूपी चा प्रश्न सुटणार आहे. प्रशासन मात्र प्रत्येक वर्षी सक्तवसुली पद्धतीने पाणीपट्टी आकारून शेतकऱ्यांकडून घेत असते. प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने उपोषणे करूनही हा प्रश्न सुटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे

बाईट-
व्हीओ- आलेगाव खुर्द ते गारअकोले– गणेशवाडी पूल या रस्त्यावरती स्वातंत्र्य काळापासून फक्त एकदा डांबरीकरण झाले होते. परंतु सध्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे.कोंढारपट्टा हे सोलापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक आहे .या भागातील लोकांना अकलूज या ठिकाणी मोठी बाजारपेठ असल्यामुळे नियमित दळणवळणासाठी या रस्त्याचा उपयोग होतो तसेच अकलूज, सराटी, बावडा या ठिकाणी शिक्षणासाठी रांजणी-भिमानगर, आलेगाव बुद्रुक,रुई, आलेगाव खुर्द, या गावातून सुमारे हजार ते दीड हजार विद्यार्थ्यांची ये–जा या रस्त्यावरून होते.परंतु या रस्त्याची गेल्या चाळीस वर्षापासून डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम झाला आहे.मणक्याचे आजार, मणक्यात गॅप पडणे, सांध्यांचे आजार यांनी ग्रस्त आहेत. रस्त्याच्या या अवस्थेमुळे लोकांच्या जीवावर बेतत आहे.
बाईट-
व्हीओ- पाणी आणि रस्ता यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाहीत तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत मतदान न करण्याचा,कोणत्याही राजकीय प्रचार सभा या गावात होऊ न देण्याचा तसेच राजकीय उमेदवार, कोणत्याही पक्षाशी संबंधित व्यक्तींना या भागात फिरू दिले जाणार नाही असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

बाईट - 1 - ग्रामस्थ

व्हीओ- वर्षानूवर्षे फक्त आश्वासनच दिली गेल्यामुळे आपले प्रश्न सोडविण्यासाठी कोणीच वाली राहिलेला नाही अशी भावना या तीन गावातील लोकांची झाली आहे.त्यामुळेच लोकशाहीतील सर्वोच्च उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवरच त्यांना नाईलाजाने बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे. Conclusion:नोट- ही बातमी पॅकेज फॉरमॅटमध्ये वापरावी ही विनंती . सोबत बाईट आणि बैठकीचे फूटेज पाठविले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.