ETV Bharat / state

300 स्वयंसेवकानी पंढरपूर केले स्वच्छ; आर्ट ऑफ लिव्हिंग, युवाचेतना फाउंडेशनच्यावतीने स्वच्छता अभियान

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील स्वच्छ भारताचा विडा आम्ही उचलला आहे. स्वच्छता अभियानात सहभागी होणऱ्या स्वयंसेवकांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे अमर कळमकर म्हणाले. पुढील वर्षी एक हजाराहून अधिक तरुणांना सहभागी करण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.

पंढरपूर स्वच्छता मोहीम
author img

By

Published : Jul 14, 2019, 9:41 PM IST

सोलापूर- आषाढी एकादशीनंतर पंढरपूर शहरात स्वच्छता करण्यासाठी 300 स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले. चंद्रभागा तिरासह घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी जाऊन स्वच्छता करण्यात आली. ही मोहीम अहमदनगर येथील आर्ट ऑफ लिव्हिंग, युवाचेतना फाउंडेशन यांच्यावतीने राबवण्यात आली.

पंढरपूर स्वच्छता मोहीम

आषाढी एकादशीसाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात. आषाढी वारीत वारकरी हजारो दिंड्यानी पंढरपूरमध्ये दाखल होतात. सर्वत्र भाविक विसावलेले असतात. आषाढी यात्रेनंतर येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य असते. यामुळे अनेक सामाजिक संस्था, संघटना स्वच्छतेचे उपक्रम राबवतात.

आर्ट ऑफ लिव्हींगचे जिल्हा प्रकल्प समन्वयक अमर कळमकर यांच्या मार्गदर्शनात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. अहमदनगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यामधून ३०० पेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानाचे हे पाचवे वर्ष असून गेल्या चार वर्षापासून पंढरपूर स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे. रविवारी सकाळी ८ वाजता स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. वेगवेगळे गट तयार करुन व प्रत्येक गटाचा एक प्रमुख नेमून वेगवेगळ्या परिसरात गटागटाने स्वच्छता करण्यात आली आहे.

पंढरपूर शहरातील ६५ एकराचा तळ, गोपाळपूर, वाळवंट परिसर, मंदिर परिसर, श्रीकृष्ण मंदिर, भक्ती मार्ग, प्रदक्षिणा मार्ग, नवी पेठ, रामबाग इतर ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा खच, ग्लास, केळीच्या साली, कुजलेले अन्न, तुटक्या चपला, पिशव्या, चंद्राभागा नदीतील कपडे असा कचरा गोळाकरुन मोठ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरण्यात आला. स्वच्छता अभियानात जयंत भोळे, घनश्याम झंवर, अ‌ॅड.सुनिल गडाख, विलास हारदे, ठकसेन गायके, योगेश काकडे, मिथुन धनराज, गणेश दळे, पांडुरंग राजगुरु, हर्षदा पोतदार सहभागी झाले होते.

Intro:mh_sol_01_pandharpur_sanitation_7201168

300 स्वयंसेवकानी केले पंढरपूर स्वच्छ,
आर्ट ऑफ लिव्हिंग व युवाचेतना फाऊंडेशन च्या वतीने पंढरपूरात स्वच्छता अभियान
सोलापूर-
आषाढी एकादशी नंतर पंढरपुर शहरात स्वच्छता करण्यासाठी 300 स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम यशस्वी राबविली. चंद्रभागा तिरासह घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी जाऊन स्वछता करण्यात आली. Body:आषाढी एकादशीसाठी देशभरातून लाखों भाविका पंढरीत श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येतात.आषाढी वारीत वारकरी हजारों दिंड्याने पंढरपूरमध्ये दाखल होत असतात.पंढरीत सर्वत्र ठिकाणी भाविक विसावलेले असतात.
आषाढी यात्रेनंतर पंढरीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असते. त्यानंतर अनेक सामाजिक संस्था,संघटना स्वच्छता उपक्रम राबवितात.अशीच नगर येथील आर्ट आॅफ लिविंग व युवा चेतना फाऊंडेशन यांच्या वतीने पंढरपूर स्वच्छता अभियाने राबविले आहे.
आर्ट ऑफ लिव्हींग चे जिल्हा प्रोजेक्ट समन्वयक अमर कळमकर यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आली. गेल्या चार वर्षापासून पंढरपूर स्वच्छ करण्याची मोहीम राबवितात.आज त्यांचे हे पाचवे वर्ष आहे.
या मोहिमेत अहमदनगर,पुणे,सोलापूर जिल्ह्यामधून जवळपास ३०० पेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
आज सकाळी ८ वाजता ही मोहीमेला सुरु झाली होती. त्यात वेगवेगळे ग्रुप तयार करुन व प्रत्येक ग्रुपमागे एक प्रमुख नेमून वेगवेगळ्या परिसरात ग्रुपने स्वच्छता करण्यात आली आहे.
पंढरपूर शहरातील ६५ एकराचे तळ ,गोपाळपूर , वाळवंट परीसर ,मंदिर परीसर ,श्रीकृष्ण मंदिर ,भक्ती मार्ग ,प्रदिक्षिणा मार्ग ,नवी पेठ ,रामबाग इतर ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा खच , द्रोन ,ग्लास , केळीच्या साली , कुजलेले अन्न ,तुटक्या चपला , पिशव्या , चंद्राभागेतील कपडे ई .कचरा गोळाकरुन मोठ्या प्लस्टिक पिशवीमध्ये भरुन स्वच्छता करण्यात आली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारताचा विडा आम्ही उचलेला आहे असे अमर कळमकर यावेळी म्हणाले तसेच या मोहिमेत सहभागी होणार्या स्वयंसेवकामध्ये सामाजिक भान निर्मान व्हावा.हा उपक्रम 4 वर्षापुर्वी आम्ही सुरु केला होता . पुढील वर्षी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रा मधून १ हजाराहून अधिक तरुण सहभागी होतील असा निर्धारही केला.

यावेळी जयंत भोळे, अमर कळमकर, घनश्याम झंवर, ॲड. सुनिल गडाख, विलास हारदे, ठकसेन गायके,योगेश काकडे,मिथुन धनराज, गणेश दळे, पांडुरंग राजगुरु, हर्षदा पोतदार.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.