सोलापूर : पंचवीस हजारांची लाच घेतना रंगहाथ पकडलेले (taking bribe of Rs 25 thousand) सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार (Bribery Education Officer Kiran Lohar) यांना कोर्टाने 3 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, किरण लोहार यांच्या संपत्तीची कसून चौकशी ( Education Officer Kiran Lohar Property Investigation) करावयाची आहे. तसेच त्यांच्या कोल्हापूर येथील घराची संपूर्ण झडती घ्यायची आहे. असे म्हणणे कोर्टात मांडत अँटी करप्शन (Anti Corruption Bureau Action) अधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. कोर्टाने ही मागणी मान्य करत अधिक तपासासाठी शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची 3 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. (Solapur News), (Solapur Crime)
अपसंपदाची चौकशी होणार- सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूर येथील शिक्षक कॉलोनी मध्ये त्यांचे निवासस्थान आहे. किरण लोहार यांच्या घराची कोल्हापूर एसीबीने तब्बल पाच तास झाडाझडती घेतली. सोमवारी रात्री सुरू दहापासून सुरू झालेली तपासणी मंगळवारी १ नोव्हेंबर पहाटे तीनपर्यंत सुरू होती. लोहार यांच्या स्थावर मालमत्तेचा अहवाल कोल्हापूर एसीबी सोलापूर एसीबीकडे सोपविण्यात येणार आहे.
शिक्षण खात्यात दिवसभर शुकशुकाट - सोमवारी सायंकाळी प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रमुख शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर कारवाई झाल्याने जिल्हा परिषद आवारात एकच खळबळ उडाली. मंगळवारी दिवसभर शिक्षण खात्यात शुकशुकाट होता. एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हता.