ETV Bharat / state

हे तर महावसुली सरकार, देवेंद्र फडणवीसांची मंगळवेढ्यात टीका - bjp

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान अवताडेंच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

हे तर महावसुली सरकार, देवेंद्र फडणवीसांची मंगळवेढ्यात टीका

author img

By

Published : Apr 12, 2021, 10:38 AM IST

पंढरपूर : राज्य सरकारचा कारभार वाईट असून हे महाविकास आघाडी नव्हे तर महावसुली सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्यातील बोराळे येथे आयोजित सभेदरम्यान केली. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान अवताडेंच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

खाण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र

महाविकास आघाडी सरकार मधील तीन पक्ष हे खाण्यासाठी एकत्रित आल्याची टीकाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. राज्यात लोकशाही नसून लॉकडाऊन शाही असल्याची टीकाही त्यांनी कठोर निर्बंधांवरून केली आहे. कोरोनावर लॉकडाऊन हा उपाय नाही. कोरोना काळात इतर राज्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. पण राज्य सरकार हे सावकारी असणार सरकार आहे. राज्य सरकार मुघलांप्रमाणे वसुली करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. राज्य सरकार ने 5000 हजारांची वसुली शेतकऱ्यांकडून केली. पण मुंबईत बिल्डर्सना मात्र सूट दिली असा आरोप त्यांनी केला. राज्यात भाजपचे सरकार असताना सर्वाधिक निधी निधी सोलापूर जिल्ह्याला दिल्याचेही ते यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.