बार्शी : बार्शी शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी नऊ दुकानांचे शटर तोडले. दुकानातील 2 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी गणेश भीमराव कानडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. बार्शी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू आहे.
चोरट्यांचा पराक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
बार्शी शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये कारमधून चोरटे आले. यामधील एका चोरट्याने औषधाच्या दुकानाचे कुलूप तोडले. शेटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर त्या चोरट्याने औषधाच्या दुकानातील रोकड लांबवली. अशाप्रकारे मुख्य बाजारपेठेतील 9 दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडून दोन लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांचा हा सर्व पराक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
तपासणी सुरू
घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पथकाने पाहणी करून तपासाची कारवाई सुरू केली. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली. आरोपींनी मास्क व हात मोजे घातलेले दिसून आले. दरम्यान, सोलापूरच्या श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास बार्शी पोलीस करत आहेत.
हेही वाचा - परिवहन मंत्री अनिल परबांना ईडीची नोटीस; संजय राऊत म्हणाले- क्रोनोलॉजी समजून घ्या...