ETV Bharat / state

वन विभागाकडून दोघा चंदन तस्करांना अटक

author img

By

Published : Jan 23, 2021, 6:57 PM IST

Updated : Jan 23, 2021, 10:42 PM IST

मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथील चंदनाचे झाड तोडताना दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

छायाचित्र
छायाचित्र

मंगळवेढा (सोलापूर) - तालुक्यातील मारापूर येथील चंदनाचे वृक्ष तोडताना वन विभागाकडून दोघांना अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले व भारत विटकर (रा. परांडा जि. उस्मानाबाद), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाकडून तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

माहिती देताना वन परिरक्षक अधिकारी

10 किलो चंदन जप्त

पंढरपूर वन परिरक्षक विभागांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये दोन आरोपींकडून दहा किलो चंदन असणारे लाकूड, एक दुचाकी असा 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ट्रॅकर जप्त

मारापूर परिसरातील वन क्षेत्रातून अवैध कोळसा व लाकडाने भरलेला अवैध वाहतूक करणारा ट्रॅकर जप्त करून पंढरपूर येथे आणला आहे. पुढील तपास व कारवाई चालू आहे.

हेही वाचा - सोलापूरमध्ये काँग्रेसचा अर्णव गोस्वामीच्या प्रतिमेला जोडे मारून आक्रोश

Last Updated : Jan 23, 2021, 10:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.