ETV Bharat / state

विशेष : दिव्यांग असूनही 'तो' वाजवतो उत्तम हलगी; उपचारासाठी मदतीची अपेक्षा - हलगी वादक किसन

कमी वयात आणि तेही दोन्ही पायाने दिव्यांग असतानाही किसनच्या अंगी असलेली हलगी वादनाची कला पाहुन अनेक जण थक्क होतात. गावात लग्न असो की कार्यक्रम किसन तिथे दोन्ही हाताच्या पंजाच्या सहाय्याने तिथे जाऊन हलगी वाजवतो. शिक्षण पुर्ण करुन हलगी वादनात करियर करण्याची जिद्द बाळगलेल्या किसनला आई सविता देखील त्याला प्रोत्साहन देते.

हलगी कलाकार
हलगी कलाकार
author img

By

Published : Nov 24, 2021, 6:54 PM IST

Updated : Nov 24, 2021, 7:11 PM IST

माढा (सोलापूर) - हजारो वर्षाची परंपरा असलेले वाद्य, कुस्तीचे लाल मैदान असो की निवडणुकीची विजयी मिरवणुक. डोळ्यांसमोर येते ती अर्थातच हलगी. ही हलगी वाजवण्यात माढा तालुक्यातील दारफळ (सिना) गावातील १० वर्षीय किसन दादु थोरात हा चांगलाच तरबेज आहे. विशेष म्हणजे इतक्या कमी वयात आणि तेही दोन्ही पायाने दिव्यांग असतानाही किसनच्या अंगी असलेली हलगी वादनाची कला पाहुन अनेक जण थक्क होतात. गावात लग्न असो की कार्यक्रम किसन तिथे दोन्ही हाताच्या पंजाच्या सहाय्याने तिथे जाऊन हलगी वाजवतो. शिक्षण पुर्ण करुन हलगी वादनात करियर करण्याची जिद्द बाळगलेल्या किसनला आई सविता देखील त्याला प्रोत्साहन देते.

हलगी वादक किसन

दारफळ गावातील डिसीसी बॅकेच्या शेजारीच पत्र्याच्या शेडमध्ये किसन हा आपल्या आई सविता व दोन मोठ्या बहिणी सोबत राहतो. वडिलांचा लहानपणीच निधन झाले. त्यानंतर पुर्ण कुटूंबाचा भार सविता यांच्यावर आला. काबाडकष्ट करुन सविता यांनी चार मुलीची लग्नही पार पाडली. भल्या पहाटेपासूनच सविता यांचा दिनक्रम सुरु होतो. गावात धुणी भांड्याची कामे करत दुपारनंतर शेतकामासाठी जाऊन त्या किसनचा आणि दोन मुलीचा सांभाळ करत आहेत. घराच्या परिसरात खेळत असताना किसन पाय घसरुन पडला. तेव्हापासून त्याला दोन्ही पायाला अपंगत्व आले आहे. किसन गावच्या जि.प. शाळेत चौथी इयत्तेत शिक्षण घेत आहे. आई व बहिण त्याला दररोज उचलून घेऊन शाळेत सोडतात. घरच्या परिस्थिती अभावी स्वत:ची हलगी घेऊ शकलेला नाही. गावातील इतर वादकांकडून हलगी मागून वाजवतो. मात्र आता किसनच्या अंगी असलेल्या हलगी वादनाच्या कलेला साथ देऊन त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. यासाठी सामाजिक सहकार्य मिळेल अशी अपेक्षा थोरात कुटूंबाला आहे.

हेही वाचा - ST Workers Strike : संपावर निघणार तोडगा..?, दुसऱ्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Last Updated : Nov 24, 2021, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.