ETV Bharat / state

KCR Pandharpur Visit : तेलंगाणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या ताफ्यातील वाहनांचे क्रमांक समानच - केसीआर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला भेट देणार

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव त्यांच्या मंत्रिमंडळासह सोलापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री केसीआर मंगळवारी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली. तिथे त्यांचे बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर मंगळवारी सकाळी केसीआर हे आपल्या मंत्रिमंडळासमवेत सोलापुरातून पंढरपूरसाठी रवाना झाले होते. दुपारी केसीआर यांनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

Chandrasekhar Rao visit Pandharpur
Chandrasekhar Rao visit Pandharpur
author img

By

Published : Jun 27, 2023, 4:00 PM IST

Updated : Jun 27, 2023, 5:14 PM IST

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या ताफ्यातील वाहनांचे क्रमांक समानच

सोलापूर : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या 600 वाहनांचा ताफा दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहे. सोमवार, मंगळवार असे दोन दिवस सोलापुरातील विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 600 गाड्यांच्या ताफा सोलापुरात पहिल्यांदाच आला आहे. आलिशान गाड्या सोलापुरातील रस्त्यावरून जातांना सोलापूरकर तोंडात बोट घालून पाहत होते. आलिशान गाड्यांने नंबर प्लेटकडे काही मोजक्याच जणांचे लक्ष गेले. सर्व वाहनांचे नंबर प्लेट एकच पहायला मिळाले, ते म्हणजे TS -09-6666.

सुरक्षेच्या कारणास्तव एकच नंबर प्लेट : के चंद्रशेखर राव यांच्या वाहनांचा ताफा सोलापुरातील हॉटेल बालाजी सरोवरमध्ये सोमवारी रात्री मुक्कामास होता. हॉटेल परिसरात आलिशान गाड्यांचा थांबलेला ताफा नागरिकांचे लक्ष वेधुन घेत होता. या वाहनांकडे बारकाईने लक्ष दिले असता, सर्व वाहनांवर एकाच क्रमांकाची नंबर प्लेट दिसत होती. ताफ्यातील वाहन चालकांना याबाबत अधिक माहिती विचारली असता, सुरक्षेच्या कारणास्तव सर्व वाहनांना एकच क्रमांक आहे. मुख्यमंत्री कोणत्या वाहनांत बसलेत हे अधिक लोकांना कळू नये म्हणून, अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती वाहनचालकांनी दिली.

जोरदार घोषणाबाजी : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एक बस आणि 600 हून अधिक गाड्या आहेत. सोलापूरला जाणाऱ्या टीममध्ये जवळपास सर्वच आमदार, खासदार, मंत्री यांचा समावेश आहे. हैदराबादहून सकाळी प्रगती भवनातून निघालेल्या बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंढरपूर, तुळजा भवानी मंदिरांना भेट देण्यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरातील विणकाम उद्योग, हातमाग युनिटला भेट देणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके सोलापुरात बीआरएस पक्षात प्रवेश करणार आहेत.

केसीआर यांचे भव्य स्वागत : के चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना अभिवादन करण्यासाठी गावोगावी हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. यावेळी जमलेल्या लोकांनी किसान सरकार, केसीआर जिंदाबादच्या घोषणा दिल्या. दोन्ही राज्यांच्या सीमांना जोडणाऱ्या गावांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. 'देश का नेता कैसा हो केसीआर जैसा हो' अशा घोषणा देत केसीआर यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

पंकजा मुडेंना ऑफर : चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाने भाजप नेत्या पंकजा मुडे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे यांनी पक्षात प्रवेश घेतल्यास त्यांना मुख्यमंत्री केले जाईल, अशी ऑफर पंकजा मुंडे यांना देण्यात आली आहे. पंकजा यांनी अद्याप यावर भाष्य केलेले नाही. त्यामुळे ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Bhagirath Bhalke Join BRS : केसीआर यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश

Last Updated : Jun 27, 2023, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.