ETV Bharat / state

मराठी शिकण्याची सोपी पद्धत! सोलापुरातील या शिक्षकाची '१९ खडी' ठरतेय शैक्षणिक क्रांती

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले किरण बाबर यांनी स्व अनुभवातून '१९ खडी' तयार केली आहे. ही  १९ खडी राज्यातील शिक्षकांची पसंती ठरत आहे. अवघ्या ४५ दिवसांत किरण बाबर यांच्या कृतीयुक्त १९ खडीच्या माध्यमातून अंगणवाडीचा मुलगाही चांगल्या पद्धतीने मराठी वाचत आहे.

सोलापुरातील किरण बाबर यांची '१९ खडी' ठरतेय शैक्षणिक क्रांती
author img

By

Published : May 8, 2019, 12:02 PM IST

Updated : May 8, 2019, 3:21 PM IST

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेले किरण बाबर यांनी स्व अनुभवातून '१९ खडी' तयार केली आहे. ही १९ खडी राज्यातील शिक्षकांची पसंती ठरत आहे. अवघ्या ४५ दिवसांत किरण बाबर यांच्या कृतीयुक्त १९ खडीच्या माध्यमातून अंगणवाडीचा मुलगाही चांगल्या पद्धतीने मराठी वाचत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

किरण बाबर हे गेल्या २२ वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कर्यरत आहेत. या २२ वर्षाच्या त्यांच्या नोकरीमध्ये जवळपास २० वर्षे त्यांनी पहिलीच्या वर्गावर ज्ञानदानाचे काम केले आहे. या २० वर्षांत जवळपास १८ वर्ष त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कन्नड भाषिक गावांमध्ये मराठीच्या शाळेवर शिक्षक म्हणून काम केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट तालुक्यामध्ये कन्नड भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. त्यामुळेच या दोन तालुक्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळाही आहेत.

सोलापुरातील किरण बाबर यांची '१९ खडी' ठरतेय शैक्षणिक क्रांती

दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये कन्नड भाषिक संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या तालुक्यामध्ये कन्नड शाळां सोबतच मराठी शाळादेखील आहेत. ज्या मुलांची मातृभाषा कन्नड आहे, अशा मुलांना मराठी शिकवत असताना मोठ्या अडचणी येत होत्या. किरण बाबर हे जवळपास १८ वर्ष, ज्यांची मातृभाषा कन्नड आहे, अशा मुलांना पहिलीमध्ये मराठी शिकविण्याचे काम करत होते. कन्नड मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्या विद्यार्थ्यांना मराठी कशा पद्धतीने सोप्यात सोपी करून शिकवता येईल याचा अनुभव त्यांना येत गेला. या विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देतानाच किरण बाबर यांनी त्यांची स्वतःची 19 खडी तयार केली. या 19 खडीच्या माध्यमातूनच त्यांनी ज्यांची मातृभाषा मराठी नाही, अशा विद्यार्थ्यांना अवघ्या दोन महिन्यांच्या काळातच मराठी वाचायला शिकवले.

सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचपूर या कन्नड भाषिक गावात किरण बाबर यांनी अध्यापनाचे काम सुरू केले होते. किरण बाबर यांनी सर्वच मुलांची मातृभाषा कन्नड असतानादेखील आपल्या अनुभवातून कृतीयुक्त आणि मनोरंजन पद्धतीने अध्यापन पद्धती विकसित केली आहे. यातूनच 19 खडीचा जन्म झाला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

किरण बाबर यांनी स्वतःच्या अनुभवातून तयार केलेल्या १९ खडीमुळे अंगणवाडीचे तसेच पहिलीचे विद्यार्थी फक्त दीड ते दोन महिन्यात मराठी वाचायला शिकतात. किरण बाबर यांनी नव्याने विकसित केलेल्या अध्यापन पद्धतीमुळे इतर शिक्षकांनादेखील त्याचा फायदा मिळू लागलेला आहे. किरण बाबर यांच्या प्रशिक्षणामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी हे दोन महिन्यात मराठी वाचायला शिकलेले आहेत.

Intro:नोट- ही बातमी विशेष बातमी चा टॅग लावून वापरावी ही विनंती.
R_MH_SOL_01_07_IDEAL_EDUCATION_PROGRAM_S_PAWAR
बाराखडी नाही तर आता किरण बाबर यांच्या '19खडी' ला शिक्षकांची पसंती.
सोलापुरातील किरण बाबर यांची '19 खडी' ठरतेय शैक्षणिक क्रांती

सोलापूर-
सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या किरण बाबर या प्राथमिक शिक्षकाने स्व अनुभवातून तयार केलेली 19 खडी ही ही राज्यातील शिक्षकांची पसंती ठरत आहे अवघ्या 45 दिवसात किरण बाबर यांच्या कृतीयुक्त 19 खडी च्या माध्यमातून अंगणवाडी चा मुलगा देखील चांगल्या पद्धतीने मराठी वाचतोय. पाहुयात किरण बाबर यांच्या एकोणीस खडी वरचा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.

Body:R_MH_SOL_01_07_IDEAL_EDUCATION_PROGRAM_S_PAWAR
हो आहेत किरण बाबर सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्राथमिक शिक्षक किरण बाबर हे हे मागील 22 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण देण्याचं काम करताय या बावीस वर्षाच्या त्यांच्या नोकरीमध्ये जवळपास वीस वर्ष त्यांनी पहिलीच्या वर्गावर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम केलेले आहे या वीस वर्षातही ही जवळपास अठरा वर्ष हे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कन्नड भाषिक गावामध्ये मराठीच्या शाळेवर शिक्षक म्हणून काम केले आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट तालुका या दोन तालुक्यांमध्ये कन्नड ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते त्यामुळेच या दोन तालुक्यांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळा ही आहेत.
दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यांमध्ये कन्नड भाषिक संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्या तालुक्यामध्ये कन्नड शाळा सोबतच मराठी शाळा देखील आहेत ज्या मुलांची मातृभाषा ही कन्नड आहे अशा मुलांना मराठी शिकवत असताना मोठ्या अडचणी येत होत्या किरण बाबर हे जवळपास 18 वर्ष ज्यांची मातृभाषा कन्नड आहे अशा मुलांना पहिली मध्ये मराठी शिकविण्याचे काम करत होते कन्नड मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवत असताना येणाऱ्या अडचणी आणि त्या विद्यार्थ्यांना मराठी कशा पद्धतीने सोप्यात सोपी करून शिकवता येईल येईल याचा अनुभव त्यांना येत गेला या विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देतानाच किरण बाबर यांनी त्यांची स्वतःची 19 खडी तयार केली आणि या 19 खडीच्या माध्यमातूनच त्यांनी ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा विद्यार्थ्यांना अवघ्या दोन महिन्याच्या या काळातच मराठी वाचायला शिकविले.
सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गापासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचपूर या कन्नड भाषिक गावात किरण बाबर यांनी अध्यापनाचे काम सुरू केले होते किरण बाबर यांनी सर्वच मुलांची मातृभाषा कन्नड असतानादेखील आपल्या अनुभवातून कृतीयुक्त आणि मनोरंजन पद्धतीने अध्यापन पद्धती विकसित केली आणि यातूनच 19 खडी चा जन्म झाला.

बाईट- किरण बाबर, 19 खडी चे निर्माते

किरण बाबर यांनी स्वतःच्या अनुभवातून तयार केलेली 19 खडी मुळे अंगणवाडीचे तसेच पहिली चे विद्यार्थी हे हे फक्त दीड ते दोन महिन्यात मराठी वाचायला शिकतात किरण बाबर यांनी नव्याने विकसित केलेल्या अध्यापन पद्धती मुळे इतर शिक्षकांना देखील त्याचा फायदा मिळू लागलेला आहे मागील 22 वर्षांच्या काळात बाबर यांनी जे अनुभव घेतले आणि त्यातून विद्यार्थ्यांना फायदा होत आहे तोच फायदा सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी किरण बाबर हे हे प्राथमिक शिक्षकांना त्यांनी विकसित केलेल्या 19 खडीचे आणि कृतीयुक्त शिक्षणाचे प्रशिक्षण देत आहेत बाबर सरांच्या या प्रशिक्षणामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थी हे दोन महिन्यात मराठी वाचायला शिकलेले आहेत त्यामुळेच प्राथमिक शिक्षक हे किरण बाबर यांच्या एकोणीस खडी ला प्राधान्य देत आहेत.

Conclusion:बाईट संतोष जाधवर केंद्रप्रमुख सोलापूर महापालिका शाळा
बाईट- आशा राजेंद्र भोसले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका
बाईट- गीता जाधवर, महापालिका शाळा पहिलीच्या शिक्षिका

नोट- ही बातमी विशेष बातमी म्हणून वापरावी तसेच चारही बाईट वापरावेत पॅकेज फॉरमॅटमध्ये बातमी करून सर्व बाईट वापरावीत हि नम्र विनंती.
या बातमीसाठी विजन खूप घेतलेले आहेत तसेच ही बातमी संपूर्ण राज्यासाठी एक खूप मोठी आणि महत्वाची अशी बातमी आहे त्यामुळे या बातमीवर योग्य प्रकारे काम करून बातमी लावावी ही विनंती
Last Updated : May 8, 2019, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.