सोलापूर- विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. निवडणुकीमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही. याचबरोबर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात. अशातच अपक्ष उमेदवार नारायण पाटील यांनी कोर्टी येथील सभेत बोलताना तानाजी सावंत यांची वैचारिक पातळी खालावली असल्याचे सांगितले आहे.
तानाजी सावंत यांच्यामुळे माझे शिवसेनेचे तिकीट कापले गेले. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले होते की, खेकड्याने धरण फोडले. जर खेकड्याने धरण फूटले असते तर बाकीची धरणे राहिली असती का ? यावरून कळते की तानाजी सावंत यांची वैचारिक पातळी किती खालावली आहे.
हेही वाचा- महेश कोठेंवर कोणताही अन्याय नाही, १४ तारखेपर्यंत निर्णय न घेतल्यास कारवाई - शिवाजी सावंत