ETV Bharat / state

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याची पंढरपूरमध्ये आत्महत्या - पंढरपूर क्राईम न्यूज

मोहोळ येथील दशरथ गिड्डे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे एसटीच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे राज्यात अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत.

ST employee commits suicide in Pandharpur
पंढरपुरात एसटी कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या
author img

By

Published : Oct 14, 2021, 6:42 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - एसटी महामंडळाच्या पंढरपूर आगारातील कर्मचारी दशरथ गिड्डे याने बुधवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गिड्डे यांच्या आत्महत्येने एसटी कर्मचाऱ्यांनमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.

मोहोळ येथील दशरथ गिड्डे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे एसटीच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचे राज्यात अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत.

दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते. आज पहाटे त्यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत.

हेही वाचा : ST महामंडळाचे शासनात विलीनीकरण होणार? शरद पवारांसोबत कामगार नेत्यांची झाली बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.