ETV Bharat / state

ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा, यापूर्वीही अनेक संकटे आली पायी वारीवर - पंढरपूर बातमी

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग हैराण आहे. या कोरोनामुळे अनेक सोहळे रद्द झाले आहे. तसाच पालखी सोहळ्यावरही परिणाम झाला आहे. 2020 साली कोरोनामुळे पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला. अशा वेळी मोजक्याच वारकऱ्यांसह पालखी सोहळा एसटी बसने पंढरपूरकडे रवाना झाला. मात्र, या वर्षी दुसरी लाट असल्याने यंदाही पायी वारी सोहळ्यासाठी सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. वारकऱ्यांनी पायी सोहळ्याला परवानगी मागितली खरी पण ती प्रशासनाने मान्य केली नाही. प्रत्येक वारीसाठी दोन एसटी बसची परवानगी दिली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 13, 2021, 8:06 PM IST

Updated : Jun 13, 2021, 8:14 PM IST

मुंबई - पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत।। पंढरपूर सर्व तीर्थक्षेत्रांचे माहेरघर. ही पंढरीची वारी केल्यानंतर इतर कोणत्याही तीर्थयात्रेला जाण्याची गरजच लागत नाही, असे संत तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. मात्र, मागच्या वर्षी म्हणजे 2020 ला या वारीचे स्वरूप बदलले. कोरोनाच्या संकटामुळे पायी वारी झालीच नाही. संतांच्या पादुका एसटीने पंढरीला नेण्यात आल्या. यावर्षीही वारीवर कोरोनाचे सावट आहे. म्हणून प्रशासनाने यंदाही एसटी बसने संतांच्या पादुका नेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. पंढरीची वारी नेमकी कधी सुरू झाली याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, या सोहळ्याला लाखो वारकरी पायी चालत पंढरीच्या दिशेने जात असतात. शतकानुशतके ही परंपरा सुरू आहे. इतिहासात या पायी वारी सोहळ्यावर अनेक आस्मानी-सुलतानी संकटे आली. मात्र, पायी पालखी सोहळा कधीच थांबला नाही.

माहिती देताना सुर्यकांत भिसे

वारीची परंपरा

पंढरीची वारी हा वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून घरात कितीही अडचण आली, नैसर्गिक आपत्ती आली तरी वारकऱ्यांनी पंढरीची वारी कधी चुकविली नाही. पंढरीच्या वारीला मोठी परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वडीलांनीही पंढरीची वारी केल्याचे अनेक दाखले इतिहासात पहायला मिळतात. संत तुकाराम महाराज यांच्या कुळातही पंढरीची वारी होती. संत तुकाराम महाराजांच्या घराण्याचे मुळ पुरुष विश्वंबर बाबा होते. तुकाराम महाराजांचीही आठवी पिढी. विश्वंबर बाबांना त्यांची आई वारीची आठवण करुन देत असे व पंधरा दिवसाच्या वारीला पाठवित असे. विश्वंबर बाबा हे विठ्ठलाचे थोर भक्त होते. विश्वंबर बाबांच्या पश्चात विठ्ठल महाराज, पदाजी महाराज, शंकर महाराज, कान्होबा महाराज व संत तुकाराम महाराजांचे वडील बोल्होबा महाराज यांनी वारीची परंपरा जपली. संत तुकाराम महाराजांनी हीच वारीची परंपरा पुढे घेवून नेली. श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर संत तुकाराम महाराजांनीच बांधले असल्याचे इतिहासात पुरावे आढळतात.

वारकरी सांप्रदाय वाढविण्याचे व त्याला बळ देण्याचे काम महाराष्ट्रातील संतांनी केले. त्यामध्ये संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत सावता महाराज, संत एकनाथ, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत गोरा कुंभार, संत तुकाराम, संत दामाजीपंत, संत कबीर, संत शेख महंमद, अशा अठरा पगड जातीतील संतानी वारकरी सांप्रदाय वाढविण्याचे व त्याला बळ देण्याचे काम केले. संत निवृत्तीनाथांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना वारकरी सांप्रदायाची दीक्षा दिली. संत तुकाराम महाराजांपर्यंत दिंडी स्वरुपात पंढरीची वारी केली जात होती. त्यांच्या दिंडीत 1 हजार 400 टाळकरी होते . या टाळकऱ्यासह संत तुकाराम महाराज पंढरीची वारी करीत असत. त्यांच्या वारीचा नेम कधी चुकला नाही. वारी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक व सांस्कृतिक ओळख आहे.

आषाढी वारी पालखी सोहळ्याची परंपरा

आषाढी वारी पालखी सोहळ्याला परंपरा आहे. संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी इ.स. 1685 मध्ये पालखी सोहळ्याला सुरुवात केली. ते श्री क्षेत्र देहूहून ज्येष्ठ वद्य सप्तमीस तुकोबारायांच्या पादुका घेवून श्री क्षेत्र आळंदीस येत. ज्येष्ठ वद्य अष्टमीस माऊलींच्या पादुका घेवून ज्येष्ठ वद्य नवमीस ते दोन्ही पादुका एकाच पालखीत घालून "ज्ञानोबा-तुकाराम" हे भजन गात श्री क्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवीत. पुढे माऊलींचा पालखी सोहळा स्वतंत्र झाला. सातारा जिल्ह्यातील आरफळगावचे सरदार हैबतबाबा आरफळकर यांनी इ. स. 1832 मध्ये हा सोहळा सुरू केला. संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून इ.स. 1845 मध्ये पुजारी गोसावी, बेलापूरकर व देहूकर या मंडळींनी सुरू केला. संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा इ.स. 1709 मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दुधलगावचे राम व शाम बंधूंनी श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथून सुरू केला. संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा नाथ महाराजांच्या वंशज जानकीबाई यांनी श्री क्षेत्र पैठण येथून इ.स. 1768 मध्ये सुरू केला. तर संत सोपानदेवांचा पालखी सोहळा श्री क्षेत्र सवंत्सर-सासवड येथून इ.स. 1895 मध्ये ज्ञानेश्वर माऊली गोसावी व धोंडोपंतदादा अत्रे यांनी सुरू केला. संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यालाही अशीच शेकडो वर्षाची परंपरा आहे. या पालखी सोहळ्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तामिलनाडु, गुजरात, राजस्थान, गोवा आदी राज्यातून सुमारे 150 ते 200 पालखी सोहळे आषाढी वारीने श्री क्षेत्र पंढरीस येतात. त्यांच्या समवेत लाखो वारकरीही पंढरपूरला येतात हा इतिहास वारीचा आहे.

पायी वारी सोहळ्यावर आलेली नैसर्गिक आणि सुल्तानी संकटं

इ.स. 1396, 1630, 1876, 1896, 1923 आणि 1972 या काळात वारीवर दुष्काळाचे सावट राहिले. वारीच्या काळात लोकांना अन्नधान्य खायला मिळाले नाही. इ. स. 1656, 1677, 1695 व 1699 मध्ये वारीवर सुलतानी संकटे आली. वारीवर निघालेल्या वारकऱ्यांवर व दिंड्यांवर विजापूरचा बादशहा आदिलशहाचा सेनापती अफजलखान, मोगल सेनापती बहादूर खान व औरंगजेब बादशहाच्या सैन्यांनी आक्रमणे केली. त्यावेळी छत्रपती शाहू महाराज व राजाराम महाराजांनी सुरक्षेसाठी आपले सैन्य देवून वारकऱ्यांचे संरक्षण केले होते. सन 1875 ते 1895 या वीस वर्षांत राज्यात कॉलराची साथ होती. हजारो लोक या साथीला बळी पडले. वारीच्या काळात पंढरपूर शहर रिकामे केले जायचे. पण, पंढरीची वारी कधी चुकली नाही. सन 1898, 1943 व 1956 ला चंद्रभागेला महापूर आला होता. संपूर्ण पंढरपूर शहराला पुराच्या पाण्याने विळखा घातला होता. त्याकाळात संतांच्या पालख्या वाखरीला थांबविण्यात आल्या होत्या. फक्त मानकरी होडीतून पादुका पांडुरंगाच्या भेटीला घेवून गेले होते. आजही वाखरीतच माऊलीचा रथ थांबविला जातो. वाखरीचा ओढा पार करुन माऊलींची पालखी भाटेंच्या रथात ठेवली जाते तर इसबावीपासून पादुका गळ्यात घालून नेल्या जातात. ही परंपरा आजही जोपासली जात आहे. सन 1873, 1893, 1899, 1905, 1910, 1925, 1944 व 1946 मध्ये राज्यात प्लेगची साथ आली होती. त्यावेळीही पंढरपूर शहर रिकामे करण्यात आले होते. फक्त संतांच्या पादुका विठुरायाच्या भेटीला आणण्यात आल्या होत्या. मागील इतिहास पाहिला तर अनेक मोठी संकटे वारीवर आली. जागतीक महायुद्धात म्हणजे 1944 व 45 ला वारीवर बंदी घालण्यात आली होती. बंदी असतानाही वारकऱ्यांनी पंढरीची वारी कधी चुकु दिली नाही.

कोरोनाची महामारी व पायी वारी

कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग हैराण आहे. या कोरोनामुळे अनेक सोहळे रद्द झाले आहे. तसाच पालखी सोहळ्यावरही परिणाम झाला आहे. 2020 साली कोरोनामुळे पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला. अशा वेळी मोजक्याच वारकऱ्यांसह पालखी सोहळा एसटी बसने पंढरपूरकडे रवाना झाला. लाखो वारकऱ्यांचा मेळा यंदा पालखी मार्गावर दिसून आला नाही. 2021 साली सगळे व्यवस्थित होईल, असे वाटले होते. मात्र, यंदाही परिस्थिती जैसे थेच आहे किंबहुना दुसरी लाट असल्याने यंदाही पायी वारी सोहळा झाला नाही. वारकऱ्यांनी पायी सोहळ्याला परवानगी मागितली खरी पण ती प्रशासनाने मान्य केली नाही.

मनाने प्रत्येक वारकरी वारीत असणार

गत वर्षी प्रत्येक पालखी सोहळ्याला एक एसटी बस देण्यात आली होती. मात्र, यंदा त्या दोन एसटी बस देण्यात येणार आहेत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यामुळे यंदाही लाखो वारकरी पंढरीला जाऊ शकणार नाहीत. मात्र, मनाने प्रत्येक वारकरी हा वारीतच असणार आहे.

हेही वाचा - घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळून कार बुडाली पाण्यात; पाहा व्हिडिओ

Last Updated : Jun 13, 2021, 8:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.