सोलापूर : शहरातील नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात आली आहे. काही सेकंदात ही चिमणी जमीनदोस्त झाली. पोलीस प्रशासनाने कारखान्याच्या चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. तसेच कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले होते.
भाजपवर संताप व्यक्त केला : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी सभासद, साखर कारखान्यातील अनेक कर्मचारी हे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेत. या दोन्ही मतदारसंघात भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. प्रशासनाने चिमणी पाडून साखर कारखाना बंद करण्याचा निर्धार केला आहे. हा सहकारी साखर कारखाना बंद पडला तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. चिमणीवरून अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी वर्ग भाजपवर संताप व्यक्त करत आहे.
चिमणी पाडली : सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणीने वातावरण ढवळून निघाले आहे. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशन प्लांटची 90 मीटर उंचीची चिमणी पाडण्यास बुधवार 14 जून पासून सुरुवात झाली आहे. या पाडकामाच्या निषेधार्थ अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव येथील शेतकऱ्याने शेतातील ऊस पेटवून दिला होता. ज्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने मला आयुष्यभर साथ दिली, ज्यामुळे माझ्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला होता, त्या सिद्धेश्वर साखर कारखान्याला बंद करण्याचा षडयंत्र रचला जात आहे. चनबसप्पा जगदाळे या शेतकऱ्याने शेतातील ऊस पेटवून देत चिमणी पाडल्याचा निषेध केला होता.
भाजपच्या बालेकिल्ल्यात नाराजीचा सूर : अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ व दक्षिण सोलापूर मतदारसंघ हे भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. चिमणी पाडल्याने अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी वर्ग संताप व्यक्त करत आहे. याचा थेट परिणाम आता लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसेल अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. अक्कलकोट मतदार संघातून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी आमदार आहेत तर, दक्षिण सोलापूर मधून भाजपचे सुभाष देशमुख आमदार आहेत.
शेतकऱ्याने ऊस पेटवून केला प्रशासनाचा निषेध : कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची 90 मीटर उंचीची चिमणी बेकायदेशीर असल्याने त्याचे पडकाम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. चिमणी पाडताना शेतकऱ्यांचा मोठा विरोध होईल या भीतीमुळे प्रशासनाने मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. साखर कारखान्याच्या परिसरात धारा 144 नुसार कर्फ्यु लागू केले होते. पोलिसांनी मंगळवारी रात्री पासून कारखान्यातील कामगारांना ताब्यात घेतले आहे. सोलापूरच्या विविध भागात शेतकऱ्यांना अडवून ठेवले आहे. शेतकऱ्यांनी चिमणीचा निषेध करत शेतातील उभे पीक पेटवून देत प्रशासनाचा निषेध केला होता.
हेही वाचा -
- Sri Siddheshwar Cooperative Sugar Factory सोलापुरातील त्या वादग्रस्त चिमणीचे पाडकाम सुरू श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात कर्फ्यु
- Tata Steel plant टाटा स्टील प्लांटची 110 मीटर लांबीची चिमणी पाडली पर्यावरण रक्षणासाठी उचलली पावले
- Blast at Brick Factory मोतिहारीमध्ये मोठी दुर्घटना वीटभट्टीची चिमणी फुटल्याने स्फोट 5 जणांचा मृत्यूअनेक गाडले