सोलापूर- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील रेल्वे आणि ईसएसआयची दोन्ही रुग्णालये कोरोना रुग्णालयामध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती सोलापूर महापालिकेचे आयुक्त दिपक तावरे यांनी दिली.
सोलापूर शहरातील शासकीय रूग्णालयात सध्या कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळे या ठिकाणी ताण पडण्याची शक्यता आहे. कोरोनाचे रूग्ण वाढल्यावर त्यासाठी प्रशासनाने आत्ताच सोय करून ठेवली आहे. रूग्णांची संख्या वाढतच गेली तर सोलापूर शहरात असलेल्या रेल्वेच्या रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रूग्णांवर उपचार केला जाणार आहे. तसेच ईएसआय रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त दिपक तावरे यांनी दिली आहे.