ETV Bharat / state

खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून ई-पास देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक - सोलापूर पोलीस न्यूज

पोलीस आयुक्त कार्यालय व पोलीस आयुक्त यांच्या निवासस्थानाजवळील अगदी हाकेच्या अंतरावर हे शुभम ऑनलाइन सर्व्हिसेसचे दुकान आहे. खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून अनेक प्रवाशांना परराज्यात किंवा परजिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास इथून काढून दिले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

Epass
ई पास
author img

By

Published : Aug 8, 2020, 7:58 AM IST

सोलापूर- लॉकडाऊन लागू झाल्यापासून नागरिकांना दुसऱ्या जिल्ह्यात किंवा परराज्यात जाण्यासाठी ई-पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे ई-पास शहर पोलीस आयुक्तालय किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत ऑनलाइनरित्या दिला जातो. त्यासाठी आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये कोविड-19 ची चाचणी गरजेची असते. एखाद्या डॉक्टरकडून घेतलेले आरोग्य तपासणी व कोविड तपासणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रमाणपत्राचा घोडेबाजार करत ई-पास काढणाऱ्या एका टोळीला सोलापूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे.

सोलापूर पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राईम शाखेने खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून ई-पास काढून देणाऱ्या शुभम ऑनलाइन सर्व्हिसेसचा पर्दाफाश केला आहे. शुभम विजयकुमार एकबोटे (वय 24 वर्ष, रा गुरुनानक नगर), राहुल विजयकुमार एकबोटे ( वय 28 वर्ष रा,गुरुनानक नगर, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. शासनातर्फे ई-पास मोफत देण्यात येतो. मात्र, या ऑनलाइन सर्व्हिसेसकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळून नागरिकांची लूट होत होती.

सोलापूरमधील गुरुनानक चौक येथे शुभम ऑनलाइन सर्व्हिसेस नावाचे दुकान आहे. येथे झेरॉक्स, कॉम्पुटर टायपिंग, ऑनलाईन फॉर्म भरून देणे आदी कामे केली जातात. पोलीस आयुक्त कार्यालय व पोलीस आयुक्त यांच्या निवासस्थानाजवळील अगदी हाकेच्या अंतरावर हे शुभम ऑनलाइन सर्व्हिसेसचे दुकान आहे. खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून अनेक प्रवाशांना परराज्यात किंवा परजिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास इथून काढून दिले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्यात आली आहे.

डॉ. आफ्रिन कलबुर्गी ( वय 30 वर्ष, रा, आसरा, सोलापूर) यांनी काही दिवसांपूर्वी एका प्रवाशाला वैद्यकीय प्रमाणपत्र दिले होते. पण या दोघांनी या वैद्यकीय प्रमाणपत्राचा गैरफायदा घेत, यामध्ये छेडछाड करून कलर प्रिंट काढून अनेकांचे खोटे नावे समाविष्ट करून ,ऑनलाइनरित्या ई-पास काढून दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

शुभम ऑनलाइन सर्व्हिसेसकडून खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून ई-पास काढून दिले जात असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. पोलीस आयुक्त कार्यालयातील सायबर क्राईम शाखेने हाकेच्या अंतरावर असलेल्या ऑनलाइन सर्व्हिसेसवर छापा टाकून, संगणक, प्रिंटर आदी साहित्य जप्त करण्यात आहे. डॉ.आफ्रिन कलबुर्गी यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक अरुण फुगे, उपनिरीक्षक बायस, पोलीस नाईक संतोष येळे, पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख, इब्राहिम शेख, प्रवीण शेळकांदे,दीपक जाधव, अमोल कानडे, पूजा कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.