माढा (सोलापूर) - माढ्यातील शेतकऱ्यांचा मुलगा आयआयटी अभियंता झाला आहे. पहिल्याच प्रयत्नात तुषार विलास कदम आयआयटी परीक्षेत उत्तीर्ण होऊन यशोशिखर पार केले आहे. शेतकरी कुटूंबातील तुषारने मिळवलेल्या या नेत्रदिपक यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
वडिल विलास आणि आई लता हे दोघे ही शेतात काबाडकष्ट करुन काळ्या आईची सेवा करत कुटूंबाचा गाडा हाकतात. आपला मुलगा आयआयटी अभियंता झाल्याने आई वडिलांचा ऊर अभिमानाने भरून आलाय. तुषारच्या शिक्षणासाठी आम्ही काबाडकष्ट करुन पैसे खर्च केले. याचे फलित झाले असल्याचे सांगतानाच आई वडिलांनी आनंदाश्रुंना मोकळी वाट करुन दिली.
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान इंदौर (आयआयटी) येथे तुषार शिक्षण घेत होता. परीक्षेचा निकाल नुकताच लागला अस यात त्याने ८६ टक्के गुण पटकाविले आहेत. उत्तीर्ण झालेल्या तुषारला परदेशी कंपनीतून पॅकेज देखील आले होते. मात्र ते तुषारने नाकारले आहे. एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यावरच अभियंता म्हणन तो कार्यरत होणार आहे. सध्या तो भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रुडकी (उत्तराखंड)येथे एमबीएचे शिक्षण घेत आहे. तुषारचे माध्यमिक शिक्षण माढ्यातील जि. प. प्रशालेत तर प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले.
स्वत:शी स्वतःची स्पर्धा करा - तुषार
कोणत्याही स्पर्धेत यश मिळवले तर हुरळन जाता कामा नये अन् अपयशाने खचू नये. अपयश पचविण्याची ताकद निर्माण करायला हवी. आपल्या मित्राला स्पर्धक न मानता अभ्यासात सातत्य ठेवत स्वत: बरोबर स्वत:ची स्पर्धा करा म्हणजे आपल्यातील क्षमता जागी होते. आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवावी. परदेशी कंपनीतन नोकरी आली आहे. मात्र, मी ती नाकारली असून एमबीए पूर्ण झाल्यावरच कार्यरत होईल.