ETV Bharat / state

सोलापूर सिटी बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; एक महिन्यांच्या पगारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे - सिटीबस कर्मचाऱ्यांचे पगारासाठी आंदोलन

सोलापूर शहर परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा मागील सहा महिन्यांपासून पगार झालेला नव्हता. कोरोनाच्या काळात कर्मचारी सेवा देत असताना देखील कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून पगार मिळालेला नव्हता. पगार मिळाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. महापौर आणि पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत एक महिन्याचे वेतन दोन दिवसात द्यायचे ठरले. यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.

Meeting in Solapur municipal corporation
सोलापूर महापालिकेत सिटी बस कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी बैठक
author img

By

Published : Aug 9, 2020, 10:26 AM IST

सोलापूर- सोलापूर सिटी बसच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस पुकारलेले आंदोलन स्थगित केले आहे. सहा महिन्यापैकी एक महिन्याचा पगार देण्याचे अश्वासन मिळाल्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सिटी बस कर्मचाऱ्यांना मागील सहा महिन्यापासून पगार मिळालेला नसल्यामुळे काम बंद आंदोलन सुरू केले होते.

सोलापूर शहर परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा मागील सहा महिन्यापासून पगार झालेला नव्हता. कोरोनाच्या काळात कर्मचारी सेवा देत असताना देखील कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापासून पगार मिळालेला नव्हता. कर्मचाऱ्यांना एकूण 16 महिन्याचा पगार मिळालेला नाही, त्यातील 10 महिन्याच्या पगारावर न्यायालयात वाद सुरू आहे. मात्र, मागील सहा महिन्याचा पगार देखील मिळाला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर शनिवारी सोलापूरच्या महापौर श्रीकांचन्ना यन्नम यांनी कर्मचारी प्रतिनिधी आणि महापालिका आयुक्त यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार तात्काळ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दुसऱ्या महिन्याचा पगार हा येत्या पंधरा दिवसात देण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पूकारलेले काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

सोलापुरातील नियोजन भवन येथे पार पडलेल्या या बैठकीला महापौर श्रीकांचना यन्नम,आयुक्त पी. शिवशंकर, सभागृह नेते श्रीनिवास करली,परिवहन सभापती जय साळुंखे, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, प्रहार संघटनेचे पदाधिकारी व परिवहन सदस्य उपस्थित होते.या बैठकीमध्ये महापौर श्रीकांचना यन्नम यांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात आयुक्त यांच्याशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार देण्यात येईल व पुढच्या महिन्याचा पगार पंधरा दिवसात देण्यात येईल,असे आश्वासन महापालिका आयुक्त यांनी दिले आहे सांगितले. या बैठकीत ठरल्यानुसार परिवहन कर्मचाऱ्यांना आता ऑगस्ट महिन्यात दोन महिन्यांचे वेतन मिळणार आहे. त्यामुळे एका महिन्याचे वेतन येत्या दोन दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर दुसऱ्या महिन्याचे वेतन पंधरा दिवसात त्यांना मिळणार आहे. त्यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले आहे. तीन दिवस सुरू असलेले हे आंदोलन शनिवारी स्थगित करण्यात आले असून आज सकाळपासून कर्मचारी कामावर रूजू होत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.