सोलापूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापुरात मोठी कारवाई केली आहे. यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 13 सप्टेंबर रोजी सोलापूर अक्कलकोट रोड सादुल पेट्रोल पंपासमोर जुना अक्कलकोट नाक्यासमोरील रोडवर सोलापूर येथे केली आहे. अवैधरित्या विनापरवाना गोवा राज्य निर्मित विदेशी दारू वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर दुय्यम निरीक्षक यु.व्ही. मिसाळ यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालत असताना कारवाई -
13 सप्टेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गस्त घालत होते. एका खबऱ्याने खात्रीलायक माहिती दिली, एका टेम्पोमधून ( MH 13- CU- 5427) गोवा बनावटीच्या दारूची तस्करी केली जात आहे. अक्कलकोट रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा लावला होता. एक टेम्पो संशयितरित्या जात असताना सदर वाहन थांबवले. सदर वाहनाची तपासणी केले असता टेम्पोमध्ये गोवा राज्य बनावटीची विदेशी दारूचे व विविध ब्रँडच्या दारूचे बॉक्स आढळून आले. वाहन मुद्देमालासह जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार गुन्हा नोंद करून दोन संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा -...म्हणून बूस्टर डोस घ्यावेच लागणार - डॉ. अविनाश भोंडवे
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सर्व मुद्देमाल जप्त -
गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य व एक टेम्पो असा एकूण 7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर नितीन धार्मिक, उप-अधीक्षक, आदित्य पवार यांचे मार्गदर्शनाखाली यु.व्ही. मिसाळ, एस.एम.बिराजदार, जवान गजानन ढब्बे, किशोर लुंगसे, रवि जगताप, चेतन व्हनगुंटी इत्यादींनी सदर कारवाई पार पाडली.
हे ही वाचा -मुंबईत आज 5 दिवसाच्या बाप्पाला निरोप, दुपारी 3 वाजेपर्यंत 578 गणेश / गौरी मूर्तींचे विसर्जन