ETV Bharat / state

विठ्ठला... लवकर शाळेची घंटा वाजूदे रे! 79 किलोमीटर सायकलवारी करत चिमुकल्यांचं पांडुरंगाला साकडं - सायकल वारी

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे आता विद्यार्थी वैतागले आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. पण विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचे आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थांनी आता थेट पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी साकडं घातलं आहे. त्यासाठी श्रीपूर येथील 15 वर्षांच्या आतील चिमुकल्यांनी सायकलवारी काढली.

shripurs
shripurs
author img

By

Published : Aug 7, 2021, 7:04 PM IST

Updated : Aug 7, 2021, 8:18 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे राज्यासह जिल्ह्यातील शाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने शाळेचे वर्ग भरवण्यात आले आहेत. पण शाळा सुरू होऊन परत वर्ग भरावेत म्हणून पांडुरंग सायकल क्लबमधील चिमुकल्यांनी श्रीपूर-पंढरपूर-श्रीपूर अशी 79 किलोमीटरची सायकलवारी केली. तसेच, शाळा लवकर सुरु व्हाव्यात म्हणून विठ्ठल चरणी साकडे घातले. तर वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा व आरोग्य संवर्धनासाठी सायकलिंग महत्वाची आहे, हा संदेश या माध्यमातून जनसामान्य नागरिकांना देण्यात आला.

शाळा सुरू करण्याचं चिमुकल्यांचं पांडुरंगाला साकडं

चिमुकल्यांची 79 किलोमीटर सायकलवारी

माळशिरस तालुक्यातील लहान मुलांनी श्रीपूर-पंढरपूर-श्रीपूर सायकलवारी केली. श्रीपूर येथील छत्रपती शिवाजी चौक येथून ही वारी निघून विठ्ठलवाडी, दसूस मार्गे पंढरपूर येथे सायकल रायडर पोहोचले. या लिटिल चॅम्प सायकल रायडरचे स्वागत श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे सोपान कदम, प्रशांत आदमाने, राहुल माने तसेच पंढरपूर सायकल क्लबचे महेश भोसले व चंद्रराव यांनी केले. सायकलिंग करणाऱ्या या बालकांना, रोहन परिचारक यांनी सदिच्छा दिल्या. तसेच सायकल रायडर्सचे कौतुक केले व पुढील प्रवासास शुभेच्छा दिल्या.

नामदेव पायरी येथे विठ्ठल चरणी साकडे

गेल्या दीड वर्षापासून राज्य सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने शाळेतील तास सुरू करण्यात आले आहेत. पण शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना नैसर्गिक शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. शाळेतील मौजमजेच्या शिक्षणातील नवीन नवीन पैलू शालेय विद्यार्थ्यांना हरवल्यासारखे वाटत आहेत. श्रीपूर येथील सायकल रायडर्समधील 15 वर्षांच्या चिमुकल्यांनी श्रीपूर ते पंढरपूर अशी सायकलवारी काढून पंढरीतील नामदेव पायरी इथे विठ्ठलाला साकडे घातले. त्यामध्ये त्यांनी 'कोरोना महामारी लवकरात लवकर जाऊ दे, शाळा पूर्वीसारखी सुरू होऊ दे' अशाप्रकारचे साकडे विठ्ठलाच्या चरणी घातले.

सायकल रायडर्समध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्यांचा समावेश

श्रीपूरमधील या चिमुकल्यांनी शाळा सुरू करण्यासाठी पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी साकडे घातले. या सायकल रायडर्समध्ये १५ वर्षांच्या आतील विद्यार्थी होते. यात प्रियंका सुभाष पवार, धनश्री भारत जाधव, अवंती जगदीश अग्निहोत्री, प्रणाली ज्ञानेश्वर, खुळे, प्रियदर्शनी संदीप घाडगे, कार्तिकी हनुमंत भोईटे, तनुश्री योगेश जोशी, श्रावणी मारुती हुणे, हर्षदा राजेंद्र शिंदे, श्रावणी विकास पाटील, पारस निलेश दोशी यांचा सहभाग होता.

महामानवांना अभिवादन करून वारीचा समारोप

ही सायकलवारी पंढपूरवरून पुन्हा श्रीपूर येथे दाखल झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करुन सायकलवारीचा समारोप करण्यात आला. सायकल रायडींग यशस्वी करण्यासाठी पांडुरंग सायकल क्लबचे अध्यक्ष देशभूषण धाईजे, उपाध्यक्ष सुभाष पवार, प्रवीण शिंदे, जगदीश अग्निहोत्री, माऊली खुळे, राहुल थिटे, नीलेश दोशी, आनंद दंदाडे यांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा - Tokyo Olympics : शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! नीरज चोप्राने इतिहास रचला, टोकियोत जिंकलं सुवर्ण पदक

Last Updated : Aug 7, 2021, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.