ETV Bharat / state

लस न घेताच लसीकरणाचे मिळाले प्रमाणपत्र; अकलूज उपजिल्हा रूग्णालयातील प्रकार

author img

By

Published : Jan 23, 2022, 9:47 AM IST

माळशिरस तालुक्यातील अकलूज उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाबाबत भोंगळ कारभार असल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेताच एका तरूणाला पहिला डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माळीनगर येथील गौरव गणेश कोळेकर असे तरुणाचे नाव आहे.

लसीकरणाचे मिळाले प्रमाणपत्र
लसीकरणाचे मिळाले प्रमाणपत्र

पंढरपूर - केंद्र व राज्य सरकारकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न केले जात आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाबाबत भोंगळ कारभार असल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेताच एका तरूणाला पहिला डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माळीनगर येथील गौरव गणेश कोळेकर असे तरुणाचे नाव आहे.

लसीकरणाचे मिळालेले प्रमाणपत्र
लसीकरणाचे मिळालेले प्रमाणपत्र

सोलापूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल महाविद्यालयात गौरव हा द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. मात्र कॉलेजमध्ये लसीकरणा शिवाय प्रवेश दिला जात नाही. शिवाय सरकारने 15 ते 18 वयोगटातील लसीकरणावर भर दिला आहे. मात्र सध्या 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी कोव्हक्सीन ही लस दिली जात आहे. माळशिरस तालुक्यातील माळीनगर येथे राहणारा गौरव टिळेकर याने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात कोव्हक्सीन या लस संदर्भात नोंदणी केली होती. मात्र सदर उपजिल्हा रुग्णालयात गेला असताना गौरवचे वय 18 वर्षे पूर्ण होणे गरजेचे होते. त्यामुळे गौरव याला कोव्हक्सीन ही लस उपलब्ध नसल्यामुळे माघारी जावे लागले. मात्र लस न घेता कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतल्याचे कोवोशील्डचे प्रमाणपत्र मात्र त्याला मिळाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.