ETV Bharat / state

शिवसेनेचा शेतकऱ्यांना मदतीचा हात; पंढरपुरात 'मदत केंद्र' सुरू

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संकट काळात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्वत्र शेतकरी मदत केंद्रांची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. यानुसार पंढरपुरात सेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
author img

By

Published : Nov 13, 2019, 9:11 PM IST

सोलापूर - पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली असून, शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सेनेच्या वतीने सांगण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संकट काळात शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्वत्र शेतकरी मदत केंद्रांची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. यानुसार पंढरपुरात सेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.

पंढरपुरात शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.

केबीपी कॉलेज रस्त्यावर सुरू करण्यात आलेल्या या केंद्राचे माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावर्षी राज्यभरात मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, अखेरच्या टप्प्यातील पिकांना याचा फटका बसल्याचे सेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेतकरी मदत केंद्र सुरू केल्याचे ते म्हणाले.

अवकाळी पावसाने झालेले नुकसान, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, पीक विम्याचे प्रश्न, कर्जमाफीचे प्रश्न यांसह प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, आदींचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी या मदत केंद्रांची मदत होणार असल्याचे शिंदेंनी सांगितले.

यावेळी जयवंत माने, संजय घोडके, सुधीर अभंगराव, माउली अष्टेकर, लंकेस बुरांडे, अविनाश वाळके, सचिन बंदपट्टे, बाबा अभंगराव, पोपट सावंतराव, पंकज डांगे, शिवाजीराव कोष्टी यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Intro:mh_sol_04_shivsena_help_center_7201168पंढरपूरात शिवसेनेचे शेतकरी मदत केंद्रसोलापूर- पंढरपूरात शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी हा संकटाशी सामना करत असतांना या शेतकऱ्यांना मदतीचा हात देता यावा यासठी शेतकरी मदत केंद्र सुरू कऱण्यात आले आहे. Body:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यावर कोसळलेल्या आस्मानी संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्यात सर्वत्र शेतकरी मदत केंद्राची स्थापना करावी असे आदेश दिले होते. यानुसार पंढरपूरात शिवसेनेच्या वतीने शेतकरी मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.केबीपी कॉलेज रस्त्यावरील जयवंतराव माने यांच्या संपर्क कार्यालयाशेजारील या केंद्राचे उदघाटन माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव यांच्या हस्ते करण्यात आले.   शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्रावर यावर्षी मोठे आस्मानी संकट कोसळले आहे. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने राज्यातील खरिपाच्या पेरण्या लांबल्या त्यामुळे नुकसान झाले तर पुढे राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान सहन करावे लागले. परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले पिके नेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे.या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी  हे शेतकरी मदत सुरु करण्यात आले असून अवकाळी पावसाने झालेले नुकसान,अतिवृष्टीमूळे झालेले नुकसान, पीक विम्याचे प्रश्न,कर्जमाफीचे प्रश्न यासह प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आदींचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी हे मदत केंद्र सुरु करण्यात आलेले आहे.    
  यावेळी जयवंत माने,संजय घोडके,सुधीर अभंगराव,माउली अष्टेकर,लंकेस बुरांडे,अविनाश वाळके,सचिन बंदपट्टे,बाबा अभंगराव,पोपट सावंतराव,पंकज डांगे,शिवाजीराव कोष्टी यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती. 

बाईट-  संभाजी शिंदे. जिल्हा प्रमुख, शिवसेना Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.