सोलापूर - गावासाठी दळणवळणाच्या प्रमुख रस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरूस्ती करावी, या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील गावकऱ्यांना रास्ता रोको आंदोलन केले. गावकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात रास्ता रोको आंदोलन करत तत्काळ गावातील रस्ता दुरूस्त करण्याची मागणी केली आहे.
मोहोळ तालुक्यातील शिरापूर हे गाव राष्ट्रीय महामार्गापासून जवळच आहे. पुणे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरून जातो. मात्र, गावात जाणारा मुख्य रस्ता खूपच खराब झालेला आहे. गावकऱ्यांनी 24 ऑगस्टला गावात सभा घेऊन रस्ता दुरूस्त करण्याचा ठराव मांडला आणि हा ठराव एक मताने मंजूर करवून घेतला आहे. गावकऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.