ETV Bharat / state

Jyoti Waghmare On Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरेंच्या 'उद्धव वाखरे'नी शिवसेनेला गहाण ठेवण्याचं पाप केलं; ज्योती वाघमारे कडाडल्या - Sanjay Raut

Jyoti Waghmare On Uddhav Thackeray : ठाण्यातील शिवसेना शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आले आहेत. दिवाळी (Diwali 2023) तोंडावर असताना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. ऐन सणासुदीला उद्धव ठाकरे हे नागरिकांना वेठीस धरण्याचं काम करत आहेत. असं म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

Jyoti Waghmare On Uddhav Thackeray
ज्योती वाघमारे कडाडल्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 9:57 PM IST

प्रतिक्रिया देताना ज्योती वाघमारे

सोलापूर Jyoti Waghmare On Uddhav Thackeray : शिवसेनेची आन, किंवा शान म्हणजे शाखा आहे. उद्धव ठाकरे गटाने शिवसेनेच्या मुंब्रा येथील शाखेला भाड्याने दिलं होतं. शिवसेनेची शाखा भाड्याने देणं म्हणजे आईच दूध विकल्या सारख आहे. उद्धव ठाकरेना ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी ठाकरे म्हणण्याऐवजी वाकडे आणि वाखरे अशी उपाधी दिली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धव वाखरेनी शिवसेनेला गहाण ठेवण्याचं पाप केलं. मुंबई महानगरपालिका भाड्याने दिली. स्वतःचा पक्ष काँग्रेसला भाड्याने दिला अशी खरमरीत टीका ज्योती वाघमारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली आहे.

उद्धव ठाकरेंवर केली टीका : सणासुदीच्या काळात उद्धव ठाकरे लोकांना वेठीस धरण्याचं काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांना ऐन सणासुदीलाच वादविवाद करण्याचं किंवा वातावरण पेटवण्याचं का सुचतंय असा प्रश्न ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला. राज्यातील जनतेला सुखा समाधानाने आनंदाने दिवाळी करू न देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे की काय? असं चित्र सध्या निर्माण झालं आहे. दिवाळीच्या काळात त्यांना राज्यात जातीय दंगली घडवायच्या आहेत का? असे अनेक प्रश्न ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केले आहेत. शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी शनिवारी सायंकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली.

संजय राऊतांनी पोपट घेऊन भविष्य सांगत बसावं : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं, पुढील काही महिन्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर नसतील. संजय राऊतांच्या वक्तव्याचं खंडण करत ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांवर खरमरीत टीका केली. संजय राऊत यांनी अनेकदा तारखा दिल्या आहेत, ते सर्व काही ठरलं का? शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक पिंजरा विकत घ्यावा, एक पोपट घ्यावा आणि रस्त्यावर लोकांची भविष्यं सांगत बसावं. असं सांगत ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा -

  1. Jyoti Waghmare On Sanjay Raut: "लाज ना अब्रू..., मी कशाला घाबरु"; ज्योती वाघमारे यांची संजय राऊतांवर बोचरी टीका
  2. Shital Mhatre: शिवसेनेकडून शितल म्हात्रे साई़डलाईन, प्रा. ज्योती वाघमारे करणार लीड?
  3. Sushma Andhare VS Jyoti Waghmare : सुषमा अंधारेंना टक्कर; शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे यांची राज्य प्रवक्तेपदी निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.