सोलापूर - शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पार्शिवावर दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास शेतकरी सहकारी सुतगिरणी सांगोला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार दरम्यान निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Live Updates : गणपतराव देशमुख पंचत्वात विलीन.. पार्शिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - senior leader ganpatrao deshmukh
16:38 July 31
गणपतराव देशमुख पंचत्वात विलीन.. पार्शिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
15:05 July 31
गणपतराव देशमुख हे राजकारणातील भीष्म पितामह - वळसे पाटील
पुणे - गणपतराव देशमुख हे राजकारणातील भीष्म पितामह होते. २५ वर्षे राजकारणात आम्ही सोबत काम केले आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झालीय, जी कधीच भरून निघणार नाही - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
12:13 July 31
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दाखल
- ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अंत्ययात्रेदरम्यान सांगोला वासियांना अश्रू अनावर
- राजकारणातील शांत व संयमी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी हजारोंचा जनसमुदाय
- दोन तासाच्या रॅलीनंतर पार्थिव निवासस्थानी दाखल; महिलांनी फोडला टाहो
- लोकांमधून लोकनेता हरवल्याची भावना
- सांगोला व सूतगिरणी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
- अमर रहे अमर रहे, गणपत आबा अमर रहे या घोषणांनी गुंजली सांगोला नगरी
- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे राहणार उपस्थित
- सोलापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार उपस्थित राहणार
- सांगोला शहरातील सूतगिरणी येथे होणार अंतिम संस्कार
- अंत्यसंस्काराची प्रशासनाकडून जय्यत तयारी
10:52 July 31
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
10:41 July 31
सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार गणपत आबा देशमुख यांचे पार्थिव सांगोला शहरात पोहोचले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अवघा जनसमुदाय लोटला आहे. 'आबा साहेब अमर रहे', अशा घोषणा कार्यकर्ते आणि नागरिकांकडून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील नागरिक भावुक झाले आहेत. तर पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त आहे.
10:05 July 31
माजी मंत्री गणपतराव देशमुख यांचे पार्थिव पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील अंतिम दर्शनासाठी दाखल झाले आहे. खर्डी येथे गणपतराव देशमुख यांचे पार्थिव आल्यानंतर अनेक लोकांना अश्रू अनावर झाले होते. ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप दिला. खर्डी येथून सांगोलाच्या दिशेने माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या रवाना होणार आहे. सांगोला येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवले जाणार आहे.
08:31 July 31
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर आज दुपारी एक वाजेच्या सुमारास सांगोला येथील शेतकरी सूतगिरणी मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार, आमदार उपस्थिती राहण्याची शक्यता आहे.
08:10 July 31
माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे पार्थिव पंढरपूर दाखल
पंढरपूर (सोलापूर) - ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचा दीर्घ आजारामुळे शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास निधन झाले ते सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव आज सोलापूरवरून पेनुर येथे आणण्यात आले. त्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला प्रदक्षिणा घालून सांगोल्याच्या दिशेने रवाना झाले आहे.