ETV Bharat / state

समाधान आवताडे यांचा पांडुरंग व संत दामाजी यांना स्मरून शपथविधी सोहळा - पंढरपूर पोट निवडणूकी बद्दल बातमी

समाधान आवताडे यांचा पांडुरंग व संत दामाजी यांना स्मरून शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री बाळा भेगडे उपस्थित होते.

Samadhan Avtade was sworn in as an Assembly member
समाधान आवताडे यांचा पांडुरंग व संत दामाजी यांना स्मरून शपथविधी सोहळा
author img

By

Published : May 12, 2021, 4:57 PM IST

पंढरपूर - पंढरपूर मंगळवेढा विधानसभ मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार समाधान आवताडे यांनी आज मी शपथ घेतो की, असे म्हणत "पंढरपूरचा पांडुरंग व मंगळवेढा संत दामाजी" यांना साक्ष ठेवून आमदारकीची शपथ घेतली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष व हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आमदार समाधान आवताडे यांना गोपनियतेची शपथ दिली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री बाळा भेगडे उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने हा सोहळा पार पाडण्यात आला.

समाधान आवताडे यांचे साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा -

राज्यामध्ये कोरोना संकट असल्यामुळे राज्य सरकारने राजकीय कार्यक्रमावर बंदी घातली आहे. मात्र, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे समाधान आवताडे 3730 मतांनी विजयी झाले होते. त्यामुळे आज त्यांचा मुंबई येथे विधान विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनामध्ये शपथविधी घेण्यात आला. यावेळी मोजक्याच मान्यवरांना प्रवेश दिला गेला होता. यामध्ये सर्व कोरोना नियमांचे पालन होताना दिसले. हंगामा अध्यक्षांनी पुष्पहार देऊन नवनियुक्त आमदार समाधान आवताडेंचे स्वागत केले.

देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांची भेट -

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी आमदारकी मिळवली. त्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह मुंबई येथे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या घरी जाऊन आभार मानले आहेत. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी बाळा भेगडे यांनी प्रभारी म्हणून काम पाहिले होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, आमदार प्रशांत परिचारक हे उपस्थित होते.

महा विकास आघाडीच्या उमेदवाराचा केला होता पराभव -

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक 17 मार्चला जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून समाधान आवताडे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती. यांच्यासह 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामध्ये 2 मे रोजी महा विकास आघाडीचे भगीरथ भालके यांचा समाधान आवताडे यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये 3733 मतांनी पराभव केला होता. त्यांचा आज आमदारकीचा शपथविधी सोहळा पार पडला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.