ETV Bharat / state

'इंग्लिशमध्ये सांगू'.. म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीत किती गुण मिळाले माहिताहे का?

'मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिशमध्ये सांगू', हा डायलॉग मारणाऱ्या 'सैराट' गर्ल आर्ची उर्फ रिंकू राजगुरुला बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाला 54 गुण मिळाले आहेत.

author img

By

Published : May 29, 2019, 7:40 PM IST

'इंग्लिशमध्ये सांगू'.. म्हणणाऱ्या आर्चीला इंग्रजीत किती गुण मिळाले माहिताहे का?

सोलापूर - 'मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिशमध्ये सांगू', हा डायलॉग मारणाऱ्या 'सैराट' गर्ल आर्ची उर्फ रिंकू राजगुरुला बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाला 54 गुण मिळाले आहेत. इतर विषयांच्या तुलनेत रिंकुला इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याने सैराट चित्रपटातील 'इंग्लिशमध्ये सांगू का' या लोकप्रिय डायलॉगची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.

रिंकू राजगुरुने सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीच्या जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये रिंकू विशेष प्रविण्यासह पास झाली आहे. तिला मराठी विषयात 86, भूगोल 98, इतिहास 86, राज्यशास्त्र 83, अर्थशास्त्र 77 आणि पर्यावरण विषयात 49 असे एकूण 600 पैकी 533 गुण आणि एकूण टक्केवारीत 82 टक्के गुण मिळाले आहेत. मात्र, तिला इंग्रजी विषयात सर्वात कमी म्हणजे 54 गुण मिळाले आहेत.

चालूवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परिक्षेचा निकाल 85.88 टक्केच लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी हा निकाल कमी लागला आहे. यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे.

Intro:For this story use file footage

slug_R_MH_01_SOLAPUR_21_AARCHI_PARIKSHA_SCRIPT_P_SAPKAL.mp4

which I sent on mojo kit no318

सोलापूर : मराठीत सांगितलेलं कळत नाही का?
इंग्लिशमध्ये सांगू हा डायलॉग मारणाऱ्या सैराट गर्ल आर्ची उर्फ रिंकू राजगुरुला बारावीच्या परीक्षेत इंग्लिश विषयाला अवघे 54 मार्क पडले आहेत.इतर विषयांच्या तुलनेत रिंकुला इंग्लिश विषयात कमी मार्क मिळाल्यानं तिच्या सैराट चित्रपटातील त्या लोकप्रिय डायलॉगची चर्चा तिच्या चाहत्यांमध्ये चर्चिली जात आहे.

Body:यंदा रिंकु राजगुरुने सोलापूर जिल्ह्यातल्या टेंभुर्णीच्या जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीची परीक्षा दिली होती.या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात रिंक विशेष प्रविण्यासह पास झालीय. तिला मराठी विषयाला 86,भूगोल 98, इतिहास 86,राज्यशास्त्र 83, अर्थशास्त्र 77 आणि पर्यावरण विषयाला 49 असे एकूण 600 पैकी 533 मार्क आणि एकूण टक्केवारीत 82 टक्के मार्क मिळाले आहेत.मात्र इंग्लिशला सर्वात कमी म्हणजे 54 चं मार्क पडल्याने ग्रामीण भागातल्या इतर मुलींप्रमाने मागेच राहिलीय. त्यामुळं तिच्या सैराट चित्रपटातील भूमिकेची आणि मराठीतल्या डायलॉगची चर्चा सुरु झालीय.

Conclusion:चालूवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परिक्षेचा निकाल 85.88 टक्केच लागलाय.गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2.53 टक्क्यांनी कमी लागलाय.
त्यात मुलींची संख्या लक्षणीय आहे.या मुलींमध्ये आर्ची उर्फ रिंकु राजगुरु चर्चेत आलीय...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.