सोलापूर - बार्शी तालुक्यातील लाडोळे येथील सदानंद पाझर तलाव फुटून शेतात पाणी शिरल्याने सुमारे १०० एकर शेत जमिनीचे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, बार्शी तालुक्यातील लाडोळे येथे १९७२ साली गावाच्या वरच्या बाजूला एक तलाव बांधण्यात आला होता. याच तलावातील विहिरीतून गावाला पाणी पुरवठा होत असतो. तसेच हा पाझर तलाव गावाच्या वरच्या बाजूला असल्याने शिवारातील सर्व विहिरीत वर्षभर पाणीसाठाही चांगला असतो.
हेही वाचा - धक्कादायक! सोलापुरात बोलेरो-दुचाकी अपघात; पती पत्नीसह मुलगा ठार
रविवारी २१ अक्टोंबर रोजी दुपारपासूनच या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या मुसळधार पावसामुळे पाझर तलाव पूर्ण भरला आणि पाणीसाठा जास्त झाल्याने पाझर तलाव फुटला. यामुळे, पाणी तलावाच्या खालीच्या भागातील सुमारे ९० - १०० शेतात घुसले. त्यामुळे शेतातील भेंडी, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता या पाझर तलावाची तत्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा, आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र विधानसभा 2019 : सोलापूर जिल्ह्यात युतीची मुसंडी की आघाडी मारणार बाजी