ETV Bharat / state

कोरोनाग्रस्तांसाठी 'आरपीएफ' जवानांनी केले प्लाझमा दान

कोरोनामुक्त झालेल्या सोलापूर रेल्वे पोलीस दलातील जवानांनी आपला प्लाझमा दान करत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी मदत केली आहे.

solapur news
solapur news
author img

By

Published : Jul 30, 2020, 5:35 PM IST

सोलापूर - कोरोनावर प्रभावी लस व उपचार शोधण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या प्लाझमाद्वारे कोरोनाग्रस्त रुग्णांवर सकारात्मक परिणाम होत आहेत. प्लाझमा थेरपीमध्ये कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझमा काढून उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णाला दिला जात आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 30 जुलै) सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात कोरोनामुक्त आर.पी एफ. (रेल्वे पोलीस दल) जवानांनी प्लाझमा दान केला आहे.

आर.पी.एफ. जवान प्रवीण कुमार आणि मनीष कुमार यांनी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात प्लाझमा दान केला. यावेळी, रक्तपेढी प्रमुख सुनील सोनवणे, विनायक कुलकर्णी, रेल्वे पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक राकेश कुमार आदी उपस्थित होते. यापूर्वी 27 जुलैला आरपीएफ जवान सुमित कुमार आणि राकेश कुमार यांनी देखील प्लाझमा दान केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश कुमार यांन दिली.

प्लाझमा थेरेपी म्हणजे काय?

कोरोनातून बरे होणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना विरोधात (प्रतिजैवके) अँटीबॉडीज तयार होतात. अँटीबॉडीज शरीरामधील रक्तातील प्लाझमा मध्ये तयार होतात. त्यामुळे कोरोनाबाधित व्यक्तीवर प्लाझमा थेरेपीच्या माध्यमातून उपचार केले जाते. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्यास वेळ लागतो. त्यावेळी कोरोना आजारातून बरे झालेल्या व्यक्तीचे प्लाझमा दिले जाते. कारण, कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीच्या प्लाझमामध्ये कोरोनाच्या विरोधा लढणाऱ्या अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात. यातून कोरोनाग्रस्त रुग्ण कोरोनावर मात करू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.