ETV Bharat / state

तणावावर मात करण्यासाठी मैदानात उतरा - पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील

महसूल विभाग राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. अलिकडे महसूल विभागाला अनेक प्रकारची कामे करावी लागतात. नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करताना ताण येणे साहजिकच आहे. या तणावावर मात करण्यासाठी खेळाचा आधार घ्यायला हवा.

solapur
तणावावर मात करण्यासाठी खेळांचा आधार घ्यावा; पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आवाहन
author img

By

Published : Feb 22, 2020, 1:24 PM IST

सोलापूर - खेळ दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनायला हवेत. महसूल कर्मचारी अधिकारी यांनी दैनंदिन तणावावर मात करण्यासाठी खेळाचा आधार घ्यायला हवा, असे आवाहन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. सिंहगड संस्थेच्या मैदानावर शुक्रवारी महसूल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.

तणावावर मात करण्यासाठी खेळांचा आधार घ्यावा; पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आवाहन

वळसे-पाटील म्हणाले की, महसूल विभाग राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. अलिकडे महसूल विभागाला अनेक प्रकारची कामे करावी लागतात. नागरिकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. या अपेक्षा पूर्ण करताना ताण येणे साहजिकच आहे. या तणावावर मात करण्यासाठी खेळाचा आधार घ्यायला हवा. खेळांमुळे ताण तणाव कमी तर होतोच. त्याच बरोबर शारिरीक तंदुरूस्ती राहते. तंदुरूस्ती असेल तर कार्यक्षमता वाढते. त्याचा कामाचा निपटारा होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - माढ्यातील दरोडा प्रकरणातील पहिल्या आरोपीला अटक

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगली, सातारा, सोलापूर ,कोल्हापूर आणि पुणे संघाच्या पथकांनी शानदार संचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी खेळाडूंना खिलाडूवृत्तीची शपथ दिली. पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकविण्याात आला. तसेच क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार्शी सोलापूर रस्त्यावरील अपघातात मरण पावलेल्या बार्शी पंचायत समितीकडील उमेद अभियानाच्या कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

हेही वाचा - महाशिवरात्रीनिमित्त काशीच्या धर्तीवर कुडलच्या घाटावर संगम आरती

दरम्यान, या कार्यक्रमासाठी आमदार बबनदादा शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, दीपकआबा साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य बळीरामकाका साठे, उमेश पाटील, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त प्रताप जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, गोपीचंद कदम आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.