सोलापूर - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशातच कंदर येथील जाहीर सभेत शिवसेनेच्या रश्मी बागल यांनी विरोधकांच्या भाषेवरून जोरदार हल्ला चढवला. जेव्हा विरोधकांची भाषा घसरते तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली असते, असे त्यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी बोलताना उत्तर दिले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवस उरले आहेत. नेत मंडळींसह कार्यकर्तेही प्रचारासाठी जीवाचे रान करताना दिसून येत आहेत. प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत.
हे वाचलं का? - आदिनाथ कारखान्याच्या पाच संचालकांचा राजीनामा; रश्मी बागल यांना मोठा धक्का
आपल्या नेत्याला बोलले की कुठल्याही कार्यकर्त्याला वाईट वाटते. पण तुम्ही एक लक्षात घेतले पाहिजे जेव्हा मतदारसंघात नसलेल्या अकोला, फुटजवळगाव गावातून गर्दी येथे गोळा करावी लागते. त्यावेळी समजून घ्या की आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास रश्मी बागल यांनी व्यक्त केला.
जेव्हा विरोधकांची भाषा घसरते तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली असते. त्यामुळे कधी टेन्शन घेण्याच्या भानगडीत पडू नका. जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के तालुका मी कव्हर केलेला आहे, अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही बागल यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.