पंढरपूर (सोलापूर) - गेल्या सात वर्षांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील एका निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक यांनी सभेत बोलताना भारतीय सैनिकांविषयी अपशब्दाचा वापर केला होता. आमदार प्रशांत परिचारक हे बार्शी ठिकाणी जात असताना त्यांच्या गाडीवर काळे ऑईल टाकून तरुणाने निषेध व्यक्त केला. हा तरुण माजी सैनिक असल्याचे समजते.
भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सात वर्षांपूर्वी एका सभेमध्ये भारतीय सैनिकांनी बद्दल अपशब्दांचा वापर केला होता. त्यानंतर आमदार प्रशांत परिचारक यांचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यांना विधान परिषदेमध्येही बंदी घालण्यात आली होती. आमदार प्रशांत परिचारक यांनी त्या वक्तव्याचा संदर्भात दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, सात वर्षानंतरही त्यांना हे वक्तव्य भोवले आहे. आमदार परिचारक हे बार्शी येथे कार्यक्रमासाठी जात असताना माढा तालुक्यातील रिधोरे येथे तरुणाने आमदार परिचारक यांच्या कारसमोर सायकल आडवी घातली. त्यानंतर भारत माता की, जय वंदे मातरम अशा घोषणा देऊन गाडीवर काळे ऑईल टाकले. आमदार परिचारक यांनी आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा-Fadnavis Vs Malik : देवेंद्र फडणवीस-नवाब मलिकांमध्ये 'वाकयुद्ध'; पाहा कोण काय म्हणाले?
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात परिचारक समर्थकांकडून निवेदन
मंगळवारी सकाळच्या सुमारास आमदार परिचारक अलिबागच्या दिशेने जात असताना रिधोरे येथे यांच्या तरुणाने काळे ऑइल फेकली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात परिचारक समर्थकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळेला पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण पवार यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा-फडणवीस सरकार काळातील दहा हजार कोटींच्या कामांची होणार चौकशी, समिती गठीत
भारतीय जवानांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांना विधानपरिषदेतून 9 मार्च 2017 रोजी निलंबित करण्यात आले होते. तसेच विधानभवन परिसरात प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली होती. त्यावर विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मोठा गदारोळ झाला हेाता. दरम्यान, विधिमंडळ अधिवेशन काळात परिचारकांचे निलंबन मागे घेण्याची मागणी सत्ताधारी पक्षांनी अनेकदा केली होती. मात्र, प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याने विरोधकांनी सातत्याने विरोध केला होता