ETV Bharat / state

सोलापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये शासनाच्या नियमानुसार होणार बिलाची आकारणी - covid-19

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी केल्या.

Private hospitals in Solapur will be billed as per government rules for corona patients
सोलापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये शासनाच्या नियमानुसार होणार बिलाची आकारणी
author img

By

Published : Jul 31, 2020, 11:07 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - कोरोना रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच आकारणी करावी. शासन निर्णयानुसार दर आकारण्यात आले आहेत का? याबाबत तपासणी करावी. कोरोनाबाधित तसेच इतर आजारांबाबत सर्व रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. आयसीएमआरच्या सुचनेनुसार कोरोनाबाधित रुग्णांची माहिती तत्काळ एन. एच. पी पोर्टलवर भरावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली.

बैठकीला आमदार भारत भालके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. जयश्री ढवळे, डॉ. पुष्पा अग्रवाल, आयएमएचे डॉ. पंकज गायकवाड, डॉ. देशमुख, आदी. उपस्थित होते.

यावेळी आमदार भारत भालके म्हणाले, पंढरपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी खासगी रुग्णालये आणि शासकीय रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे, कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यासाठी हायफलोनेझल ऑक्सिजन यंत्रणा खरेदी करण्यासाठी आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन दिली जाईल. पंढरपुरच्या रुग्णालयातील रुग्णांच्या व्यवस्थेची पाहणी जिल्हा समितीने केली आहे. रुग्णांसाठी आवश्यक सोयी, सुविधा, कोविड वार्ड, ऑक्सिजन व्यवस्था, मनुष्यबळ, महात्मा फुले जन आरोग्य योजना आदींची माहिती घेऊन त्यांनी यावेळी आवश्यक सूचना केल्या.

नारायण चिंचोली येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी -

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी केल्या.

पंढरपूर (सोलापूर) - कोरोना रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसारच आकारणी करावी. शासन निर्णयानुसार दर आकारण्यात आले आहेत का? याबाबत तपासणी करावी. कोरोनाबाधित तसेच इतर आजारांबाबत सर्व रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. आयसीएमआरच्या सुचनेनुसार कोरोनाबाधित रुग्णांची माहिती तत्काळ एन. एच. पी पोर्टलवर भरावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली.

बैठकीला आमदार भारत भालके, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, तहसिलदार वैशाली वाघमारे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. जयश्री ढवळे, डॉ. पुष्पा अग्रवाल, आयएमएचे डॉ. पंकज गायकवाड, डॉ. देशमुख, आदी. उपस्थित होते.

यावेळी आमदार भारत भालके म्हणाले, पंढरपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी खासगी रुग्णालये आणि शासकीय रुग्णालयांनी समन्वयाने काम करावे, कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहता कामा नये. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यासाठी हायफलोनेझल ऑक्सिजन यंत्रणा खरेदी करण्यासाठी आमदार फंडातून निधी उपलब्ध करुन दिली जाईल. पंढरपुरच्या रुग्णालयातील रुग्णांच्या व्यवस्थेची पाहणी जिल्हा समितीने केली आहे. रुग्णांसाठी आवश्यक सोयी, सुविधा, कोविड वार्ड, ऑक्सिजन व्यवस्था, मनुष्यबळ, महात्मा फुले जन आरोग्य योजना आदींची माहिती घेऊन त्यांनी यावेळी आवश्यक सूचना केल्या.

नारायण चिंचोली येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी -

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.