सोलापूर - दहीहंडी उत्सवावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांना यंदाही कोरोनाचा जबर फटका सोसावा लागणार आहे. कारण राज्य सरकारने श्री कृष्णजन्माष्टमीला साजरा होणारा सार्वजनिक दहिहंडी उत्सव रद्द केला आहे. यामुळे कुंभारकाम करणाऱ्या व्यवसायिक आणि कारागिरांचे मोठे नुकसान होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दर आठवड्याला किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमावेळी शासन नवे नियम लागू करत आहे. पण, या सार्वजनिक उत्सवांवर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांची मात्र परवड सुरूच आहे.
मुख्यमंत्र्यांनी केले होते आवाहन
बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. पण, गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे जे बाळ अनाथ झाले आहेत. त्यांची काय अवस्था आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यावरही काही देशामध्ये टाळेबंदी सुरू आहे. इस्रायल देशात पुन्हा मास्कची सक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर आपण समजुतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक दहीहंडी उत्सवावर बोलताना म्हणाले. यंदाही सार्वजनिक दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला. आरोग्याला प्राधान्य देऊन सण काही काळ बाजूला ठेवू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
दहीहंडी उत्सवाबाबत माहिती
लहानपणी दही, दूध, तूप व लोणी या पदार्थांची खूप आवड होती. कृष्णापासून चोरून यशोदा माता दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे. पण, कृष्ण दह्याची हंडी मिळवण्यात यशस्वी होत असे. त्याचे मित्र त्याला ही दह्याची हंडी मिळवण्यासाठी मदत करत असत. त्याचे प्रतीक म्हणून दरवर्षी गोकुळाष्टमीनंतर दहीहंडीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
दहीहंडी उत्सवावर अवलंबून असलेल्याची परवड सुरू
ऐन दहीहंडी उत्सवासमोर राज्य सरकारने बंदी आणली आहे. सोलापुरातील दहीहंडी तयार करणाऱ्या व्यावसायिक आणि कारागिरांवर मात्र संक्रात आली आहे. राज्य सरकारने बंदी आणल्याने हंड्याची विक्री थांबली आहे. लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. कुंभार व्यासायिकानी अनेक कारागिरांना बोलावून लाखोंच्या हंड्या बनवून घेतल्या आहेत. विक्री झाल्यावर त्यांच्या पगारी होणार होत्या. पण, तयार केलेला माल तसाच गोडावूनमध्ये पडून असल्याने कारागिरांना पगार किंवा त्यांचे वेतन देण्यासाठी त्यांकडे पैसा नाही. कुंभार व्यसायिक आणि कारागीर यांची परवड सुरू आहे.
हेही वाचा - श्रावणातील चौथा सोमवार व अष्टमीनिमित्त विठ्ठल-रखुमाईची फळा-फुलांनी सुंदर आरास, पाहा व्हिडिओ