पंढरपूर - राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसटी बस सेवा दोन महिन्यापूर्वी बंद केली होती. त्यानंतर 1 जून रोजी एसटी बस सेवेला काही प्रमाणात शिथिलता देत सुरू करण्यात आली. पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी होणारी गर्दी ही मोठी आहे. त्यामुळे 17 एप्रिल पासून पंढरपूर एसटी बस स्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांना राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आल्याची माहिती पंढरपूर आगार प्रमुख सुधीर सुतार यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
पंढरपुरातून धावणार लांब पल्ल्याच्या गाड्या
राज्यात संचारबंदी असल्यामुळे एसटी बसच्या चाकांना गती मिळत नव्हती. मात्र, गेल्या एक जून पासून राज्य परिवहन मंडळातील बसेसना जिल्हास्तरापर्यंत सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. 17 जून पासून राज्य सरकारकडून पंढरपूर आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्यांना सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. या गाड्या पुणे, मुंबई, जळगाव, सातारा, सोलापूर, नागपूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, कोकण भाग या ठिकाणी एसटी बसेस सोडण्याची परवानगी दिली आहे. त्यामध्ये कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
एसटी बसेस पूर्ण क्षमतेने भरल्या जाणार
पंढरपूर आगार मधून लांब पल्ल्याच्या एसटी बसला सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. एसटी बस पूर्ण क्षमतेने भरली जाणार आहे. यामध्ये प्रवासी नागरिकांसाठी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - मराठा समाजाच्या समन्वयकांनी रस्त्यावर उतरून आरक्षणाची लढाई लढावी - सदाभाऊ खोत