ETV Bharat / state

लसीकरणाचा पंढरपूर पॅटर्न : शहर व तालुक्यात 40 हजार नागरिकाचे लसीकरण, तालुका प्रशासनाचा अनोखा उपक्रम - पंढरपूर कोरोना लसीकरण

राज्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये कोविड साखळी तोडण्यासाठी व प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहिमेवर जोर दिला जात आहे. लसीकरणासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी होऊन गोंधळ झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र पंढरपूर शहरातील लसीकरणाबाबत प्रशासनाकडून एक अनोखा पंढरपूर पॅटर्न राबविण्यात येत आहे.

Pandharpur pattern of vaccination
Pandharpur pattern of vaccination
author img

By

Published : May 16, 2021, 9:18 PM IST

पंढरपूर - राज्यासह जिल्ह्यामध्ये कोविड साखळी तोडण्यासाठी व प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून लसीकरण मोहिमेवर जोर दिला जात आहे. लसीकरणासाठी प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची तोबा गर्दी होऊन गोंधळ झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. मात्र पंढरपूर शहरातील लसीकरणाबाबत प्रशासनाकडून एक अनोखा पंढरपूर पॅटर्न राबविण्यात येत आहे. या पॅटर्नमुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील चाळीस हजार नागरिकांचे यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर लसीकरण पॅटर्न राज्यात प्रचलित होत आहे.

पंढरपूर प्रशासनाकडून लसीकरणा संदर्भाचा पॅटर्न..

कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे लसींची मागणी वाढली आहे. मात्र प्रशासनाकडून लस उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिक भल्या पहाटेपासून लसीकरण केंद्रावर गर्दी करतात. त्यामुळे कोरोना वाढीचा धोका निर्माण होतो. पंढरपूर येथे महसूल, नगरपरिषद आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम फत्ते केली जात आहे. यामध्ये लसीकरणाच्या आदल्या दिवशी ज्यांची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे, अशा नागरिकांची यादी संबंधितांना पाठवली जाते. नागरिकांना तसेच एसएमएस ही केले जातात. त्यामुळे अनावश्यक गर्दी लसीकरण केंद्रावर होत नाही.

लसीकरण संदर्भातील गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून अनोखी शक्कल..

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरण केंद्रावर होणारी नागरिकांची गर्दी आणि शिस्तबद्ध होण्यासाठी स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून आदल्यादिवशी ज्या नागरिकांनी नोंदणी केली आहे. अशा नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येते, ही यादी आदल्या दिवशीच अशा सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवली जाते. लसीकरण यादीमधील संबंधित व्यक्तीला पालिकेतून आदल्या दिवशीचा मेसेज देखील पाठवला जात असतो. त्यामुळे ज्यांचे लसीकरण होणार आहे. असेच नागरिक लसीकरण केंद्रावर उपस्थित राहतात. त्यामुळे नागरिकांची गर्दी होत नाही आणि नागरिकांचे लसीकरण सुलभ होते.

पंढरपूर शहर व तालुक्यात 40 हजार जणांचे लसीकरण..

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव मोठा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सर्वात प्रथम पंढरपूर तालुका व शहरात लसीकरणावर जोर दिला आहे. पंढरपूर शहरात दोन लसीकरण केंद्रे आहेत तर ग्रामीण भागात 5 लसीकरण केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे पंढरपूर तालुक्‍यात लसीकरणाबाबत तुटवडा निर्माण होत आहे. तरीही पंढरपूर तालुका प्रशासनाने शहरात दहा हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे तर ग्रामीण भागात तीस हजार लोकांचे लसीकरण मोहीम फत्ते झाली आहे. मात्र प्रशासनाकडून लसीकरण मोहिमेबाबत योग्य ती दक्षता घेतली जात आहे. ज्या नागरिकांची लसीकरण होणार आहे. त्या नागरिकांना केंद्रावर येण्याची परवानगी दिली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.